एक करोड रुपयाचे कोकेन विकणाऱ्या नायजेरियनला अटक, ठाणे पोलिसांची कामगिरी

0

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

क्राईम ब्रँच युनिट 5 ने मोठया शीताफिने एका नायजेरियन इसमाकडून कोकेन आणि मेफेड्रीन हस्तगत केल्याचे आज अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

दिनांक 27/1/2022 रोजी संध्याकाळी ठाणे घोडबंदर रोड कासारवडवली येथील “द बाईक सुरज प्लाझा “या हॉटेलच्या गेट समोर एक नायजेरियन इसम हा कोकेन व मेफेड्रॉन हा अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखा युनिट 5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती, त्या प्रमाणे वरिष्ठच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक अरुण क्षिरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे, पोलीस उप निरीक्षक शिवाजी कानडे व पोलीस पथक यांनी सापळा रचला व डिक्सन चिडिबेर इझे वय 30 वर्ष राहणार ओम साई एस आर ए संस्था संघर्षनगर चांदिवली मुंबई यास कोकेन व मेफेड्रॉन सह ताब्यात घेतले.

या आरोपीकडून 274 ग्रॅम कोकेन व 60 ग्रॅम मेफेड्रॉन पावडर असा एकूण 1.12,00,000/-रुपये किंमतीचा अमली पदार्थ, गुन्ह्यात वापरलेली 1 हुंदाई आय -20 कार,6 मोबाईल फोन्स, एक इलेक्ट्रिक वजन काटा असा एकूण 1 करोड 17 लाख 38 हजार 360 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.

सदर आरोपी रिपब्लिक ऑफ नायजेरियाचा पासपोर्ट घेऊन 1 वर्षाच्या बिसनेस व्हिसावर इंडियात आला होता, त्याने हे कोकेन आफ्रिकन देशातून आणले असल्याचे व ठाणे, मुंबई, येथे बऱ्याच लोकांना विकले असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या आरोपीला न्यायालयाने 1/2/2022 पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. हा आरोपी सराईत अमली पदार्थ विकणारा इसम असून त्याच्यावर यापूर्वी मुबंई गुन्हे शाखा युनिट -10 येथे गुन्हे दाखल असून सद्या तो जमिनावर सुटला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.