सलमान, शाहरुखला मागे टाकत ‘हा’ अभिनेता ठरला सर्वाधिक मानधन घेणारा…

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

 

थलपथी विजय (Thalapathy Vijay) हे साऊथ सिनेसृष्टीतील (South Cinema) सर्वात मोठे नाव आहे. एवढेच नाही तर सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता ठरला आहे. जबरदस्त फॅन फॉलोइंग आपल्या त्याची पाहायला मिळते. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. थलपथी विजयचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतात. आता थलपथी विजयबद्दल मोठी बातमी येत आहे की तो भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता बनला आहे. तो त्याच्या एका चित्रपटासाठी 200 कोटी रुपये मानधन घेत असल्याचे सांगितले जात आहे.

मीडिया रिपोर्टनुसार त्याने आगामी चित्रपटासाठी तब्बल २०० कोटी रुपये घेतल्याचे सांगण्यात आले आहे. थलपथी विजयने त्याच्या पुढील चित्रपटासाठी दक्षिण उद्योगातील लोकप्रिय दिग्दर्शक व्यंकट प्रभू (Director Venkat Prabhu) यांच्याशी हातमिळवणी केली आहे. ही रक्कम एजीएस एंटरटेनमेंटकडून थलपथी विजयला दिली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने सलमान आणि शाहरुख खान यांना सुद्धा कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.