तुमच्या आपसातील भानगडी बाजूला ठेवा ; संजय सावंत यांचा भाजप -शिंदे गटावर टीका

0

 

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभा निवडणुकीत भाजप २४८ तर शिंदे गट ४० जागा लढवेल, असे वक्तव्य केले. या वक्तव्यानंतर  शिंदे सरकारवर टीका करून हे मिंधे सरकार असून आता तरी त्यांनी जागे झाले पाहिजे. तुमच्या आपसातील भानगडी बाजूला ठेवा व अवकाळी पावसामुळे जे नुकसान झाले त्याकडे बघावे अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी शिंदे सरकारवर केली. रविवारी ठाकरे गटाच्या ‘शिवगर्जना’ या मेळाव्याचे केमिस्ट भवन येथे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णु भंगाळे, समाधान महाजन, दीपकसिंग राजपूत, हर्षल माने, जिल्हा संघटक गजानन मालपुरे, युवासेना प्रमुख पियूष गांधी, नीलेश चौधरी आदी उपस्थित होते. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांबद्दल आमदार संजय शिरसाठ यांनी केलेल्या वक्तव्याचा या वेळी निषेध करण्यात आला.

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आगामी काळात जिल्ह्यात व परिसरात सभा होणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर व विधानसभा निवडणुकीसंदर्भात टॉयलेट राहण्याच्या सूचना सावंत यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here