Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»ठाकरेंच्या विश्वासू नेत्याने सोडली साथ
    राजकारण

    ठाकरेंच्या विश्वासू नेत्याने सोडली साथ

    लवकरच करणार भाजपमध्ये प्रवेश
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 15, 2026No Comments763 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    कोकणातील राजकीय घडामोडींना वेग आला असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला रत्नागिरी जिल्ह्यात मोठा धक्का बसण्याची चिन्हे दिसत आहेत. ठाकरे सेनेचे रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख सहदेव बेटकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता ते येत्या बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

    सहदेव बेटकर हे रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबी समाजातील एक प्रमुख चेहरा म्हणून ओळखले जातात. ओबीसी समाजामध्ये त्यांचा प्रभाव असल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षांतराचा निर्णय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करण्यापूर्वीच सहदेव बेटकर यांनी ठाकरे सेनेतील जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. अखेर या चर्चांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बुधवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सहदेव बेटकर यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचे सांगितले जात आहे.

    या प्रवेशामुळे कोकणातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, कोकण हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. अशा परिस्थितीत ठाकरे गटातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्याने भाजपची वाट धरल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला हा मोठा धक्का मानला जात आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर होत असलेल्या या पक्षांतरामुळे कोकणातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता असून सर्वांचे लक्ष आता सहदेव बेटकर यांच्या अधिकृत भाजप प्रवेशाकडे लागले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif