madden mobile frozen gifts whats in them pilzvergiftungen aktuell lego gift box for sale big w photos coupon code hp ink coupons 2015
Thursday, December 1, 2022

शिक्षक भरती घोटाळा – 7800 जणांना अपात्र ठरवणार

- Advertisement -

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

राज्यात शिक्षक पात्रता परीक्षेतील (TET Exam) झालेल्या गैरव्यवहाराबाबत धक्कादायक माहिती समोर आलीय. या घोटाळ्यातील तब्बल 7 हजार 880 बोगस शिक्षकांवर कारवाई करण्यात येणार आहे.  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून (maharashtra state council of examiniation) कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

- Advertisement -

2019- 2020 मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा झाली होती. या परीक्षेत  गैरप्रकार (TET Exam Scam) झाल्याचं समोर आलं. यानंतर पुणे सायबर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर चौकशी करण्यात आली.  तब्बल 7 हजार 880 उमेदवार गैरप्रकारात सहभागी असल्याचं समोर आलं आता या बोगस शिक्षकांवर आता कारवाई होणार आहे.

- Advertisement -

 पत्रक जाहीर

शिक्षक पात्रता परीक्षा 2019 चा अंतिम निकाल  28 ऑगस्ट 2022 ला वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानुसार एकूण 16 हजार 705 उमेदवार पात्र ठरले. त्यापैकी 7 हजार 880 उमेदवार हे गैरप्रकारामध्ये समाविष्ट असल्याचे निष्पन्न झालं. यात 293 उमेदवारांनी आरोपीसोबत बनावट प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले आहे. तर उर्वरीत 87 उमेदवार हे आरोपींच्या संपर्कात आढळून आलेले आहे. या गैरप्रकारमध्ये समाविष्ट परीक्षार्थी/ उमेदवार यांचे विरुद्ध परीक्षा परिषदेने शास्ती निश्चित केलेली आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने बुधवारी (3 ऑगस्ट)  480 पानी पत्रक जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे यात परिषदेने गैरव्यवहार करणाऱ्या 7 हजार 880 उमेदवारांची यादीच जाहीर केली आहे. यात परीक्षा दिलेल्या या उमेदवारांना आता कधीही परीक्षा देता येणार नाही. ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली होती. त्यांची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. ज्यांच्या नियुक्त्या झाल्या आहेत त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात येणार आहे.

शिक्षक पात्रता परीक्षा 2019 (19 जानेवारी 2020) च्या परीक्षेमध्ये झालेल्या गैरप्रकारामुळे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांच्या जर नियुक्त्या झाल्या असतील तर, त्यांची सेवा तात्काळ संपविण्यात यावी. तसेच याची नोंद नियुक्त्या झालेल्या विभागांनी घ्यावी,  असे आदेश या पत्रकात देण्यात आले आहेत.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या