TET परीक्षा गैरव्यवहार; तब्बल 25 किलो चांदी, 2 किलो सोने जप्त

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी आतापर्यंत मोठं घबाड जप्त केले. त्यानंतर शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा पुणे पोलिसांच्या एका पथकाने आरोपी अश्विन कुमार याच्या बंगळुरू येथील घरातून तब्बल 24 किलो चांदी दोन किलो सोनं आणि काही हिरे जप्त केले आहे.

टीईटी भरती घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांनी यापूर्वी जी ए सॉफ्टवेअरच्या अश्विन कुमार याला अटक केली होती. 25 किलो चांदी आणि 2 किलो सोने जप्त टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी अश्विन कुमार याला कर्नाटकातील बंगळुरू येथून अटक केली आहे. त्यानंतर त्याच्या घराची पोलिसांनी झाडाझडती घेतली असता पोलिसांना मोठं घबाड आढळून आलं आहे.

अश्विन कुमार याच्या घरातून 25 किलो चांदी आणि 2 किलो सोन जप्त करण्यात आले आहे. पुणे पोलिसांच्या टीमने अश्विन कुमार याच्या बंगळुरू येथील घरी झाडाझडती केली असता हे घबाड सापडलं आहे. पेपरफुटी प्रकरणात अश्विन कुमार हा प्रीतिश देशमुख बरोबर काम करत होता. तुकाराम सुपेंच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड आरोग्य भरतीनंतर, म्हाडा आणि आता टीईटी पेपरफुटी प्रकरणाने राज्यातील वातावरण तापून निघालं आहे.

टीईटी पेपरफुटी प्रकरणी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केली. पोलिसांनी सुपे यांच्या घरी टाकलेल्या धाडीत लाखोंचा मुद्देमाल आढळला होता. यानंतर आता पोलिसांनी सुपे यांच्या घरी आणखी एक धाड टाकली आहे. यामध्ये पोलिसांच्या हाती मोठं घबाड लागलं आहे.

छापेमारीत आरोपी सुपे याच्या घरात पोलिसांना दोन कोटीहून अधिक रुपयांची रक्कम आणि लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आढळले आहेत. सुपे यांच्या घरी छापा टाकायच्या आधी पत्नी आणि मेहुण्याने ही रक्कम दुसऱ्या ठिकाणी लपवली होती.  परीक्षा विभागाचे माजी आयुक्त सुखदेव डेरे यांना अटक तुकाराम सुपे याच्या घरी जप्त करण्यात आलेल्या या रकमेनंतर इतरही ठिकाणी पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. सुपे याने इतरांकडे पैसे ठेवण्यास दिले होते आणि आता ते सुद्धा जप्त करण्यात येत आहेत.

आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची रक्कम, दागदागिने जप्त करण्यात आले आहेत. तुकाराम सुपेंवर अखेर राज्य सरकारची कारवाई टीईटी पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली होती. अखेर राज्य सरकारने धडक कारवाई करत परीक्षा तुकाराम सुपेला निलंबित करण्यात आले आहे. शासनाने महाराष्ट्र नागरी सेवेतील नियमान्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन तुकाराम सुपेला अटकेच्या दिनांकापासून निलंबित करण्यात आले असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.