दहशतवादी हल्ला, मोठी किंमत मोजावी लागेल

'व्हाईट हाऊस'जवळच्या गोळीबारावर ट्रम्प संतापले

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क

अमेरिकेत वॉशिंग्टन डीसी येथील व्हाईट हाऊसजवळ झालेल्या गोळीबाराने जगात खळबळ उडाली आहे. एका व्यक्तीने अचानक व्हाईट हाऊसच्या गार्ड्सवर गोळीबार केला. हा दहशतवादी हल्ला आहे, हल्लोखोरला मोठी किंमत मोजावी लागेल, असा गंभीर इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. या घटनेची जगभरात जोरदार चर्चा सुरू आहे. अमेरिकेतली न्याय विभागाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लकनवालने २०२१ मध्ये एका विशेष व्हिसा कार्यक्रमांतर्गत अमेरिकेत प्रवेश केला. त्याचे नागरिकत्व उघड झाल्यानंतर, सर्व अफगाण नागरिकांसाठी स्थलांतर थांबवण्यात आले आहे.

गोळीबार झाल्यानंतर दोन्ही सैनिकांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्या दोघांचाही मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. एलॉन मस्क यांनी एक्सवर पोस्ट करत दोन सैनिकांचा मृत्यू झालाचा दावा केला आहे. अमेरिकन तपास पथकाने या हल्ल्यामागे २९ वर्षाचा रहमानउल्लाह लकनवाल असल्याचा संशय व्यक्त केला आहे. रहमानउल्लाह लकनवाल हा वॉशिंग्टनमध्ये राहणारा अफगाण नागरिक आहे. गोळाबारानंतर काही क्षणात व्हाईट हाऊसचे इतर नॅशनल गार्ड्स घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी संशयिताला ताब्यात घेतले. लकनवाललाही गोळी लागली आणि तो ताब्यात आहे.

या हल्ल्याच्या वेळी फ्लोरिडामध्ये असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसजवळ झालेल्या गोळीबाराबद्दल गंभीर इशारा दिला. ज्याने सुरक्षारक्षकांवर गोळीबार केला त्याला खूप मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशाराच ट्रम्प यांनी दिला आहे. त्याशिवाय हा दहशतवादी हल्लाच असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

व्हाईट हाऊस जवळ गोळीबार करणारा रहमानउल्लाह लकनवाल हा अफगाणिस्तानमधील स्थलांतरित असल्याचे अमेरिकन मिडिया ने दावा केला आहे. लकनवालने ऑपरेशन अलायज वेलकम अंतर्गत अमेरिकेत प्रवेश केला होता. त्याला वॉशिंग्टनमधील बेलिंगहॅम येथे पुनर्वसन करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रहमानउल्लाह लकनवाल हा वॉशिंग्टन डीसीमधील फरागुट वेस्ट मेट्रो स्टेशनजवळ थांबला होता. तो पहाटे २:१५ वाजता (स्थानिक वेळेनुसार) एका व्हाईट हाऊसच्या कोपऱ्यावर पोहोचला अन् त्याने गोळीबार केला. त्याने एका गार्ड्सच्या छातीत अन् एकाच्या डोक्यात गोळी झाडली.

Leave A Reply

Your email address will not be published.