Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»शिरसोलीत महापुरुषाचे बॅनर फाडल्याने तणाव
    ताज्या बातम्या

    शिरसोलीत महापुरुषाचे बॅनर फाडल्याने तणाव

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 18, 2026No Comments400 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    आरोपीच्या अटकेसाठी ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन
    जळगाव : तालुक्यातील शिरसोली येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावलेले बॅनर अज्ञात समाजकंटकाने फाडून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर स्टेटस म्हणून ठेवल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेचे वृत्त गावात वाऱ्यासारखे पसरताच ग्रामस्थ आणि समाजबांधवांनी बस स्थानक परिसरात मोठा जमाव केला. आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केल्याने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता.
    तालुक्यातील शिरसोली येथील बस स्थानकावर जयंतीनिमित्त बॅनर लावण्यात आले होते. काल एका जणाने हे बॅनर फाडले आणि त्याचा व्हिडिओ (रील) बनवून सोशल मीडियावर स्टेटस म्हणून ठेवला. या प्रकारामुळे समाजात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड आपल्या ताफ्यासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आंदोलकांनी यावेळी आक्रमक पवित्रा घेत जोपर्यंत आरोपीला बेड्या ठोकल्या जात नाहीत, तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार केला होता. अखेर पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी दोषीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले. या घटनेमुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण होते, मात्र पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून वाद मिटवला. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून समाजकंटकावर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात

    May 14, 2026

    खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर

    May 13, 2026

    पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif