Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!
    • एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील
    • शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक
    • व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
    • पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!
    • रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात
    • नीट पेपरफुटी प्रकरणामागे सर्व भाजपचेच नेते
    • नीट पेपर फुटी प्रकरणात पेपर सेटर्सनीच केला घात!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ब्रेकिंग»मणिपूर पुन्हा तणाव वाढला : पाच जिल्ह्यांत इंटरनेट बंद
    ब्रेकिंग

    मणिपूर पुन्हा तणाव वाढला : पाच जिल्ह्यांत इंटरनेट बंद

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 8, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    मणिपूर गेल्या काही वर्षांपासून सातत्याने धुमसत आहे. येथील तणाव निवाळण्याची चिन्ह दिसत नाही. राज्यातील पाच जिल्हे इंफाल पश्चिम, इंफाल पूर्व, थौबल, बिष्णूपूर आणि ककचिंगमध्ये इंटरनेट आणि मोबाईल सेवा पाच दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे. मैतई समाजाचे नेते अरामबाई तेंगगोल यांच्या अटकेनंतर लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी अनेक ठिकाणी तीव्र प्रदर्शन केले. काही ठिकाणी जमाव हिंसक झाला.

    अरामबाई यांच्या अटकेच्या आडून काही असामाजिक तत्त्वे समाज माध्यमांचा वापर करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी प्रक्षोभक संदेश, चित्रे आणि व्हिडिओ प्रसारित करण्यात येत आहे. त्यामुळे शांतता प्रक्रियेला गालबोट लागण्याची शक्यता आहे. गृह विभागाचे सचिव एन. अशोक म्हणाले की या घटनांमुळे कोणतीही पूर्वसूचना न देता आपत्कालीन परिस्थितीत इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे असामाजिक तत्त्वे त्यांचा अजेंडा राबवू शकणार नाहीत. तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

    शनिवारी रात्री उशीरा मणिपूर पोलिसांनी अरामबाई तेंगगोल यांना अटक केली. अनेक लोक त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरले. क्वाकईथेल आणि युरिपोक परिसरात लोकांनी रस्त्यावर टायर आणि जुने फर्निचर जाळून विरोध प्रदर्शन केले. त्यांनी अरामबाई यांना सोडण्याची जोरदार मागणी केली. काही ठिकाणी सुरक्षा यंत्रणा आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची आणि धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर येत आहे. तर प्रशासनाने या जिल्ह्यात अतिरिक्त सुरक्षा दलांना पाचारण केले आहे. या नेत्याची अटक का करण्यात आली. त्याच्यावर काय आरोप आहेत, हे समोर आलेले नाही.

    मणिपूर 3 मे 2023 पासून अशांत आहे. मैतई बहुल आणि कुकी बहुल परिसरात हिंसा झाली. तेव्हापासून हे दोन्ही समाज एकमेकांवर आरोप करत आहेत. त्यातून त्यांच्यात हिंसा झाली आहे. कुकी समाजाला सध्या राज्यात अनसूचीत जमातीचा दर्जा देण्यात आला आहे. मैतेई समाज सुद्धा अनुसूचीत जमातीचा दर्जा देण्याची मागणी करत आहे. तर कुकी समाजाने मैतईंच्या या मागणीला कडाडून विरोध केला आहे. तेव्हापासून दोन्ही समाजात सातत्याने हिंसक घटना घडत आहेत. 9 मे रोजी मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. सध्या मणिपूरमध्ये राष्ट्रपती शासन लागू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

    May 18, 2026

    ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप

    May 16, 2026

    वन्यप्राण्यांची तहान भागविण्यास शासन अपयशी?

    May 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif