Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अपघात»इराण- अमेरिकेतील युद्धाचा धुराळा पुन्हा उडाला
    अपघात

    इराण- अमेरिकेतील युद्धाचा धुराळा पुन्हा उडाला

    पुन्हा भिडले : नवीन हल्ल्याची भर : 15 लोकांचा मृत्यू
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 26, 2026No Comments234 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    गेल्या चार वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला विराम मिळालेला नाही. आता नव्याने दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले चढवले आहे. अनेक ठिकाणं त्यांनी लक्ष्य केले आहे. मॉस्कोनुसार, शनिवारी रशियाच्या ताब्यातील जपोरिज्जिया प्रदेशातील हॉलिडे कॅम्पोवर युक्रेनने हल्ला चढवला. त्यात 12 जणांचा प्राण गेला. युक्रेनच्या उत्तर-पूर्व परिसरात रशियाने ड्रोन हल्ला चढवला. तिथे तीन लोकांचा मृत्यू ओढावला. शुक्रवारी युक्रेनची राजधानी कीवजवळ रशियाने जोरदार हल्ला चढवला. त्यात कमीत कमी 10 लोक ठार झाल्याचे आणि 100 हून अधिक लोक जबर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या चार वर्षांपासून दोन्ही देश एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. दोघांमधील चर्चेच्या सर्व फेऱ्या निष्फळ ठरलेल्या आहेत. या नवीन युद्धामुळे जगाचा जीव पुन्हा टांगणीला लागला आहे.

    रशियाची सेना युक्रेनकडे आगेकूच करत आहे. त्याचवेळी युक्रेनने ड्रोन हल्ले चढवले. कीवने मॉस्कोची चाल अगोदरच ओळखली. त्यांनी अनेक ठिकाणी सैन्यावर जोरदार हल्ले चढवले. या हल्ल्यांमुळे रशियन सैन्याची रसद तुटली. इंधनाचा तुटवडा जाणवला. यामुळे रशियन सैनिकांना पुढे सरकता आले नाही. व्होलोदिमीर झेलेन्स्की हे रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतीन यांच्यावर दबाव टाकत असल्याचे समोर येत आहे. क्रेमलिनने नेमलेले प्रमुख येवगेनी बालित्स्की यांनी जपोरिज्जिया भागातील एक रेस्टॉरंट कीवने लक्ष्य केल्याचे म्हटले. त्यात 12 लोकांचा मृत्यू ओढावला. त्यात चार मुलांचा समावेश आहे. परिसरात 19 लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्यावर युक्रेनने अद्याप कोणतीही तात्काळ प्रतिक्रिया दिलेली नाही. रशियाच्या हल्ल्यात युक्रेनी खासगी टपाल सेवेचा एक चालक मृत्यूमुखी पडला.

    रशियाचे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की युक्रेनच्या ड्रोन लपवलेल्या ठिकाणी रशियाने हल्ले चढवले. दक्षिण-पूर्वी युक्रेनमधील जपोरिज्जियामधील या शॉपिंग सेंटरवर रशियाच्या ड्रोनने हल्ला केला. तिथे आग लागली. त्यात काही लोक जखमी झाले. युक्रेनचे राष्ट्रपती व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी शुक्रवारी एक मोठी प्रतिक्रिया दिली, त्यानुसार, गोपनीय माहितीनुसार, रशिया लांबपल्ल्याच्या क्षेपणास्त्राचा वापर करण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. येत्या 48 तासात रशिया असा हल्ला करण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.

    दरम्यान झेलेन्सकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहे. मंगळवारी वॉशिंग्टनमध्ये ही भेट होईल. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली आहे. ट्रम्प यांच्या दिवसभरातील कार्यक्रमांच्या जंत्रीत याविषयीची माहिती देण्यात आली आहे. कीवकडून अजून या भेटीवर कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध लवकर थांबावे अशी अपिल जगभरातून करण्यात येत असतानाच पुन्हा दोन्ही देशांचे एकमेकांवर ताजे हल्ले सुरू आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    September 16, 2026

    बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!

    September 16, 2026

    शालेय पोषण आहाराचा टेम्पो उलटून मजुरांचा जागीच मृत्यू

    September 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif