लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्रातून गेल्या काही दिवसांपासून थंडी हळूहळू कमी होत आहे. थंडीचा प्रभाव ओसरला असून कडाक्याच्या उन्हामुळे तापमानात मोठी वाढ झाली आहे. मात्र, याच काळात हवामान विभागाने पावसाचा इशारा दिलाय. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. परस्परविरोधी वाऱ्यांच्या स्थितीमुळे वातावरणात हा बदल होत असून उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.
संक्रातीनंतर महाराष्ट्रातील थंडीचा प्रभाव हळूहळू कमी झाला आणि तापमानात वाढ झाल्याने उकाडा वाढला. आता हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन-तीन दिवसांत वातावरणात बदल होऊन उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

