Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिक्षकाचे चौथीच्या ५ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे
    • तर अमेरिका इराणचे सर्वकाही नष्ट करेल..
    • फरार फौजदारासह पुत्राला अटक
    • इराण-इस्त्रायल युद्धामुळे साखरेचा गोडवा हरवला
    • सावित्रीमाईंची क्रांती हाच स्त्री शिक्षणाचा खरा आधार!
    • पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते महामंडळे लवकरच स्थापन करणार!
    • स्थानिक आणि संजय गांधी उद्यान प्रशासनात वाद!
    • हुंडाबळीच्या घटना पुरोगामी महाराष्ट्रात धक्कादायक!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»शेतकऱ्याकडून लाच घेताना तहसीलदाराला रंगेहाथ पकडले
    गुन्हे वार्ता

    शेतकऱ्याकडून लाच घेताना तहसीलदाराला रंगेहाथ पकडले

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 20, 2026No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    शेतकऱ्याकडून लाच घेताना तहसीलदाराला एसीबीने रंगेहाथ पकडल्याची घटना उघडकीस आली आहे. बीडच्या परळीतील तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्याविरोधात लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने मोठी कारवाई केली. काही वेळापूर्वी त्यांना लाच घेताना ताब्यात घेण्यात आले. एसीबीच्या या कारवाईमुळे बीडमध्ये खळबळ उडाली.

    मिळालेल्या माहितीनुसार, परळी येथील वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले. शेतकऱ्याकडून ५० हजारांची लाच घेताना त्यांना एसीबीने पकडले. तक्रारदाराकडून सोलंसी (ऐपतीचे) प्रमाणपत्र देण्यासाठी २० हजार रुपयांची तहसीलदारांकडून मागणी करण्यात आल्याची तक्रार बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. या तक्रारीनंतर लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.

    लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदारांना लाच घेताना पकडण्यात आले. तक्रारदाराकडून सुरुवातीला ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र तडजोडीनंतर २० हजार रुपयांवर सौदा ठरल्याची माहिती समोर आली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर पथकाने पडताळणी करून सापळा रचला. दरम्यान तक्रारदाराच्या हालचालींवर संशय आल्यानंतर तहसीलदार मुंडे यांनी पैसे स्वीकारण्यास टाळाटाळ केल्याचे सांगण्यात येत आहे.

    तरीही एसीबीने आवश्यक पुरावे संकलित करत पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. या घटनेमुळे परळी तालुक्यातील महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून जिल्ह्यातही या कारवाईची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. संबंधित अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास बीड एसीबीकडून केला जात आहे. भ्रष्टाचाराविरोधातील या कारवाईमुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात असून प्रशासनातील पारदर्शकतेसाठी अशा कठोर कारवाया आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे.

    #bribe #farmers ACB Anti-Bribery and Corruption Squad Beed Parli Tehsildar Tehsildar Venkatesh Munde
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    शिक्षकाचे चौथीच्या ५ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे

    March 10, 2026

    फरार फौजदारासह पुत्राला अटक

    March 10, 2026

    इराण-इस्त्रायल युद्धामुळे साखरेचा गोडवा हरवला

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.