Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अपघात»पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    अपघात

    पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड

    उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदांत एमर्जन्सी लँडिंग
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 11, 2026No Comments295 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या हेलिकॉप्टरचे तांत्रिक बिघाड झाला. उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदात हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात येताच पायलटने एमर्जन्सी लँडिंग केले. मंगळवारी पश्चिम बंगालच्या कोलाघाट येथे ही घटना घडली. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी हे कोलकातावरून पश्चिम मेदिनीपूर येथील केशपूरला जात होते. मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

    रिपोर्टनुसार, मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये कोलकाता विमानतळावरून उड्डाण करण्यापूर्वीच तांत्रिक बिघाड दिसून आला होता. मात्र, काही वेळातच ही अडचण दूर करण्यात आली, त्यानंतर हेलिकॉप्टरने सकाळी ११ वाजून २१ मिनिटांनी उड्डाण केले. या सुरुवातीच्या तांत्रिक बिघाडाबाबत सध्या विमानतळ प्राधिकरणाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आली नाही.

    उड्डाण केल्यानंतर काही वेळातच म्हणजे साधारण दुपारी १२ वाजता हेलिकॉप्टरमध्ये पुन्हा अचानक तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले. दुसरीकडे, मेदिनीपूरमध्ये मुसळधार पाऊस आणि खराब हवामानामुळे तिथे हेलिकॉप्टर उतरवणे शक्य नव्हते. ही परिस्थिती लक्षात घेता कोलाघाट येथील हेलिपॅडवर हेलिकॉप्टर सुरक्षितपणे उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला.

    स्वातंत्र्यसैनिक खुदीराम बोस यांचा हुतात्मा दिन आहे. याच निमित्ताने मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांचे जन्मस्थान असलेल्या केशपूरमधील मोहबनी गावात जात होते. मोहबनीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबाबत ग्रामस्थांमध्ये प्रचंड उत्साह होता. तिथे त्यांच्यासाठी एक तात्पुरता हेलिपॅडही तयार करण्यात आला होता, ज्याची पाहणी पोलीस अधीक्षक पापिया सुलताना यांनी केली होती. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या एसपीजीनेही सुरक्षा व्यवस्थेचा अनेकदा आढावा घेतला होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!

    September 6, 2026

    दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली

    September 6, 2026

    नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif