Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»क्रीडा»टीम इंडियाने आशिया कप 2025 जिंकूनही ट्राॅफीशिवाय साजरा केला विजयोत्सव !
    क्रीडा

    टीम इंडियाने आशिया कप 2025 जिंकूनही ट्राॅफीशिवाय साजरा केला विजयोत्सव !

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 29, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    टीम इंडियाने आशिया कप 2025 जिंकूनही ट्राॅफीशिवाय साजरा केला विजयोत्सव !

    भारताच्या विजयानंतर मोदींच्या ट्विटवर पाकिस्तानचा संताप

    नवी दिल्ली I लोकशाही न्यूज नेटवर्क

    आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला 5 विकेट्सने पराभूत करून नवव्यांदा विजय मिळवला. या विजयानंतर संपूर्ण देशात उत्साहाचं वातावरण असून भारत-पाकिस्तान आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यानंतर सादरीकरण समारंभात गोंधळ झाला. सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने एसीसी प्रमुख मोहसिन नकवी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. हे नाट्य सुमारे दोन तास चालले. त्यानंतर मोहसिन नक्वी मैदानाबाहेर गेले आणि आयोजकांमधील एकाने ड्रेसिंग रूममध्ये ट्रॉफी घेतली. असे असूनही, भारतीय खेळाडूंनी अनोख्या पद्धतीने विजय साजरा केला. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स (पूर्वी ट्विटर) वर म्हटलं, “खेळाच्या मैदानातही ऑपरेशन सिंदूर, निकाल तोच लागला. भारताने पुन्हा विजय मिळवला. आमच्या क्रिकेटर्सना शुभेच्छा.” या शब्दांमधून भारताच्या क्रिकेट संघाच्या आत्मविश्वासाबरोबरच पाकिस्तानला भूतकाळातील काही कटू वास्तवांची आठवणही करून दिली गेली.

    पाकिस्तानमध्ये या ट्विटवरून राजकीय खळबळ उडाली. संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी प्रतिक्रिया दिली, “मोदी उपखंडातील क्रिकेट संस्कृती व भावना नष्ट करत आहेत. त्यांनी शांतता व चर्चेची शक्यता संपवली आहे.” विश्लेषकांच्या मते, ही प्रतिक्रिया केवळ राजकीय नव्हे, तर भारताच्या विजयामुळे पाकिस्तानात निर्माण झालेल्या अस्वस्थतेचंही प्रतिबिंब आहे.

    विशेष म्हणजे ख्वाजा आसिफ यांना भारताच्या क्रिकेट विजयाने ‘धोका’ वाटला, परंतु पाकिस्तानमधील दहशतवादी हालचालींवर ते काही बोलले नाहीत. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने पाकिस्तानातील अनेक टेरर कॅम्प नष्ट केले होते, तरी पाकिस्तानकडून शांततेचा आव आणणे ढोंगीपणाचं प्रतीक असल्याचंही सुरक्षा विश्लेषकांचे मत आहे.

    याच दरम्यान आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी देखील ट्विटवर नाराजी व्यक्त केली, “खेळात युद्धाला ओढणं हा खेळ भावनेचा अपमान आहे,” असं ते म्हणाले.

    विश्लेषकांच्या मते, भारताच्या या क्रीडाविजयानंतरचा परिणाम फक्त देशांतर्गत नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही जाणवू लागला आहे. पंतप्रधान मोदींच्या ट्विटमधून भारताने फक्त खेळातच नव्हे, तर शब्दांद्वारेही प्रभावी संदेश दिला आहे.

    ACC chief Mohsin Naqvi Asia Cup 2025 Prime Minister Narendra Modi Team india
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!

    September 4, 2026

    अनिल चौधरींसह तिघे शिवसेनेत दाखल

    September 3, 2026

    मुंबई बाबत युएनचा धक्कादायक अहवाल!

    September 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif