Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिक्षकाचे चौथीच्या ५ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे
    • तर अमेरिका इराणचे सर्वकाही नष्ट करेल..
    • फरार फौजदारासह पुत्राला अटक
    • इराण-इस्त्रायल युद्धामुळे साखरेचा गोडवा हरवला
    • सावित्रीमाईंची क्रांती हाच स्त्री शिक्षणाचा खरा आधार!
    • पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते महामंडळे लवकरच स्थापन करणार!
    • स्थानिक आणि संजय गांधी उद्यान प्रशासनात वाद!
    • हुंडाबळीच्या घटना पुरोगामी महाराष्ट्रात धक्कादायक!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»सागवान तस्करीचा प्रयत्न उधळला; तिघांना अटक
    ताज्या बातम्या

    सागवान तस्करीचा प्रयत्न उधळला; तिघांना अटक

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 18, 2026No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    किनगाव ता. यावल

    किनगावपासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघझिरा येथील नियंत्रित वनक्षेत्रात सागवानाची झाडे तोडून त्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या तिघांविरुद्ध वनविभागाने कारवाई केली आहे. या प्रकरणात एकाला तात्काळ अटक करण्यात आली असून, फरार असलेल्या दोघांनाही नंतर पकडण्यात आले आहे.

    वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, वाघझिरा राउंड स्टाफ कंपार्टमेंट क्रमांक १४७ मध्ये गस्त घालत असताना एका संशयित व्यक्तीस सागवानाची झाडे तोडून त्याचे ब्लॉक तयार करताना आणि मोटारसायकलवरून वाहतूक करताना आढळले. अधिकाऱ्यांनी पाठलाग केल्यानंतर आरोपी सुशील केशराम पावरा (रा. चिखली, ता. वारला, मध्यप्रदेश) याला ताब्यात घेतले.

    दरम्यान, इतर दोन आरोपींनी सागवानाचे तुकडे फेकून देत घटनास्थळावरून पळ काढला. जप्त करण्यात आलेल्या सागवान ब्लॉक्सचे वजन ०.०८६ घनमीटर असून त्याची अंदाजित किंमत ₹१,९१४ इतकी आहे. तसेच या प्रकरणात एकूण ₹२२,६५८ किमतीचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या संदर्भात वाघझिरा वनपाल यांनी १४ फेब्रुवारी २०२६ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी संजय गेंडा पावरा (रा. वाघझिरा, ता. यावल) आणि परशुराम तेरसिंह पावरा (रा. वाघझिरा, ता. यावल) हे दोघे फरार असल्याचे स्पष्ट झाले होते.

    आरोपी सुशील केशराम पावरा याला भारतीय वन कायदा, १९२७ च्या कलम २६(१) ड, के आणि ४१(२) ब अंतर्गत न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याला १८ फेब्रुवारीपर्यंत वन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच १६ फेब्रुवारी २०२६ रोजी फरार आरोपी संजय गेंडा पावरा आणि परशुराम तेरसिंह पावरा यांना अटक करून यावल न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांनाही २७ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन वन कोठडीत पाठवले आहे. ही कारवाई यावल वनविभाग, जळगाव येथील उपवनसंरक्षक, यावल येथील सहाय्यक वनसंरक्षक तसेच यावल पश्चिम येथील वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वाघझिरा वनाधिकारी जगदीश बारेला राठोड व त्यांच्या पथकाने ही धडक कारवाई यशस्वी केली. वनसंपत्तीची हानी करणाऱ्यांविरुद्ध अशाच कठोर कारवाया सुरू राहतील, असा इशारा वनविभागाने दिला आहे.

    #arrest Forest Department Kingaon Madhya Pradesh Smuggling Teak waghzira Yaval
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    स्थानिक आणि संजय गांधी उद्यान प्रशासनात वाद!

    March 10, 2026

    अल्पवयीन मुलीला डांबून ठेवत आळीपाळीने बलात्कार

    March 9, 2026

    अज्ञानाचा काळोख घालवून ज्ञानाचा लक्ख प्रकाश पसरवला!

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.