Saturday, January 28, 2023

स्तुत्य; बालदिनानिम्मित वर्गशिक्षकाने स्वखर्चाने मुलांना नेले यात्रेत

- Advertisement -

 

शेंदुर्णी, लोकशाही न्यूज नेटवर्क:

येथिल गरुड प्राथमिक विद्यामंदीर मधील शिक्षक स्वप्नील गरुड यांनी आपल्या ३री च्या विद्यार्थ्यांना गावात सूरु असलेल्या यात्रात्सोवात स्वखर्चाने सहलीला नेऊन अनोख्यारितीने बालदिन साजरा केला.

- Advertisement -

यावेळी विद्यार्थ्यांनी यात्रेतील खेळण्यांचा व खाद्यपदार्थांचा मनसोक्त आनंद घेतला. शिक्षक म्हणुन मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद हा जगात न मिळणाऱ्या मौल्यवान गोष्टी पेक्षा ही मोठा असल्याचे मत स्वप्नील गरुड यांनी व्यक्त केले. या स्तुत्य उपक्रमाचे पालक वर्गातुन कौतुक होत आहे. त्यासह या उपक्रमाला त्यांच्या मित्र राहुल गरुड तसेच माजी विद्यार्थी आयुष पाटील, देवेश बारी यांनी सहकार्य केले.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे