Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»कर्तव्यावर असतांनाच शिक्षकाने घेतला गळफास
    जळगाव जिल्हा

    कर्तव्यावर असतांनाच शिक्षकाने घेतला गळफास

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 26, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

    पाचोरा शहरातील देशमुख वाडी परिसरात असलेल्या पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या सुपडु भादू प्राथमिक विद्यालयात एका शिक्षकाने दौराने गळफास लावून फाशी घेतल्याची घटना घडली. हा शिक्षक विविध व्यसनाने जडलेला असल्याने मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी झालेला होता. त्यामुळे त्या शिक्षकांनी हे पाऊल उचलले, अशा चर्चेला उधाण आले होते. घटनास्थळी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ, संचालक सतीश चौधरी, वासुदेव महाजन, भूषण वाघ, भडगाव महाविद्यालयाचे प्राचार्य गायकवाड यांनी भेट दिली.

    मूळचे दहिगाव संत ता. पाचोरा येथील रहिवासी असलेले व ह. मु. आशीर्वाद ड्रीम सिटीत राहत असल्याने शिक्षक रविंद्र भारत महाले (वय – ४२ वर्ष) हे देशमुखवाडी परिसरातील पहिली ते चौथीपर्यंत असलेल्या प्राथमिक शाळेत गेल्या बावीस वर्षांपासून कार्यरत होते. नित्याप्रमाणे २५ जुन रोजी सकाळी सात वाजता शाळा भरल्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता जेवणाचे सुट्टी झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी जेवणासाठी खाली पाठवले.

    दरम्यान तिसऱ्या मजल्यावर समोरच्या रिकाम्या खोलीच्या दरवाजाची आतून कडी लावून त्यांनी छताच्या कडीला ३० ते ३५ फुट दोरी गळ्याला आवळला. प्रथम खुर्चीचा सहारा घेत टेबलावर चढत दोरीला गळफास लावून शिक्षकाने आत्महत्या केली. दरम्यान पाच ते सहा विद्यार्थी लवकर जेवण आटवून नित्याप्रमाणे त्या रूममध्ये इतर विद्यार्थ्यांचे जेवण होईपर्यंत खेळत होते. अश्यात दरवाजाच्या फटीतून विद्यार्थ्यांनी बघीतले असता सदरची घटना लक्षात आली.

    त्यांनी धावत जाऊन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र आतून दरवाजा बंद होता. विद्यार्थ्यांनी पळत जाऊन खाली उभे असलेल्या आशिष पाटील व शार्दुल वाघ सह इतरांना याबाबत माहिती दिली. तीन – चार शिक्षक धावत तिसऱ्या मजल्यावर गेले. या शिक्षकांनो पळत जाऊन पाहिले असता शिक्षकाने आतून दरवाजाची कडी बंद केलेली होती. दरवाजा उघडत नसल्याने शिक्षकांनी दरवाजा तोडून शिक्षक रवींद्र महाले यांना मयत अवस्थेत खाली उतरवून पोलिसांना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधला.

    मयत शिक्षक रवींद्र महाले यांच्या पाश्चात वृद्ध आई, वडील, पत्नी, एक भाऊ, एक बहीण, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक अशोक पवार, सहायक पोलीस निरीक्षक संजय निकुंभ, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायळ यांनी पंचनामा केला. मृतदेह रुग्णवाहिका चालक अमोल पाटील व किशोर लोहार यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. मयत शिक्षक रवींद्र महाले यांचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी केल्यानंतर दुपारी ३:३० वाजता त्यांच्यावर दहिगाव संत येथे अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात

    May 13, 2026

    गिरणा नदीपात्रात बैलगाडी उलटली; शेतकऱ्याचा बुडून अंत!

    May 12, 2026

    दारूच्या व्यसनापायी हसते खेळते घर उद्ध्वस्त

    May 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif