Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अपघात»व्हॉट्सअप स्टेटस ठेवून शिक्षकाने संपवलं आयुष्य
    अपघात

    व्हॉट्सअप स्टेटस ठेवून शिक्षकाने संपवलं आयुष्य

    दोन मुलांसह गोदावरी नदीत घातली कार
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 17, 2026No Comments894 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील ३ जणांनी सामूहिक आत्महत्या केली. या घटनेमुळे नांदेड हादरले आहे. जिल्हा परिषद शिक्षकाने आपल्या २ मुलांना सोबत घेऊन आत्महत्या केली. व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेट्स ठेवत नंतर कारमध्ये तिघे बसून शिक्षकाने कार थेट नदीपात्रात घातली. या घटनेत कारमध्येच गुदमरून तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांच्या त्रासाला कंटाळून या शिक्षाकाने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या नांदेड पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅपला स्टेट्स ठेऊन २ मुलांसह जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने वरिष्ठांना दोष देत आत्महत्या केली. नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील आमदुरा गोदावरी नदी पात्रात कार घालून या शिक्षकाने चिमुकल्यासह जीवनयात्रा संपवली. सुनील मोरे असं आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव असून ते हिमायतनगरच्या पोटा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक म्हणून कर्तव्यावर होते. त्यांच्या आत्महत्येमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली.

    या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एसडीआरएफच्या पथकाने कार आणि कारमधील तिघांचे मृतदेह नदीपात्रा बाहेर काढले आहेत. सुनील मोरे यांनी हदगाव गट शिक्षणाधिकारी आणि केंद्रप्रमुखाच्या जाचाला कंटाळलो असल्याचे व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवलं. भोकर तालुक्यातील बेंबर गावचे शिक्षक सुनील मोरे हे मूळ रहिवासी होते. त्यांच्या मुलीचे सारा असं नाव असून मुलाचे नाव सुमित असे होते. या घटनेने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून एका जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी आपल्या चिमुकल्या मुलांसह आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला

    September 7, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?

    September 7, 2026

    बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif