धक्कादायक; शाळेत शिकवतांना मुलांसमोरच शिक्षकाने सोडले प्राण… 

0

 

प्रयागराज, लोकशाही न्यूज नेटवर्क:

गेल्या काही दिवसांत डेंग्यूचं (Dengue) देशातलं प्रमाण वाढलं आहे. या आजाराचं विशेष म्हणजे यात प्लेटलेट्स (platelets) झपाट्यानं कमी होतात. अशक्तपणा (Weakness) येतो आणि काही वेळा रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो.(Sometimes the patient may even die) उत्तर प्रदेशात प्रयागराजमध्ये डेंग्यूमुळे एका शिक्षकाचा वर्गात शिकवत असतानाच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (In Prayagraj, Uttar Pradesh, a teacher died of dengue while teaching in the classroom)

देशाच्या सर्वच भागांत डेंग्यूच्या केसेस वाढत आहेत. उत्तर प्रदेशात प्रयागराजमध्ये 20 ऑक्टोबरला डेंग्यूमुळे एका महाविद्यालयीन शिक्षकाचा वर्गात शिकवतानाच मृत्यू झाला. अल्फ्रेड सुमित कुमार कुजूर सिव्हिल लाइन भागातल्या सेंट जोसेफ महाविद्यालयात शिकवत होते. बारावीच्या विद्यार्थ्यांना ते कॉमर्स शिकवायचे. काहीच दिवसांपूर्वी 32 वर्षांच्या सुमित कुमार यांना डेंग्यू झाला होता. त्यातून थोडं बरं वाटल्यानंतर ते कामावर आले. अकरावीच्या विद्यार्थ्यांना ते वर्गात कॉमर्स शिकवत असताना अचानक त्यांची तब्येत बिघडली. काही कळण्याच्या आतच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे महाविद्यालयात एकच गोंधळ उडाला. त्यामुळे महाविद्यालयाला 2 दिवस सुट्टी देण्यात आली. आता दिवाळीनंतरच महाविद्यालय सुरू होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्लेटलेट्स 25 हजारांपर्यंत कमी झाल्या होत्या. त्यामुळे काही दिवसांपासून ते सुट्टीवर होते. या कारणामुळे मुलांचा अभ्यासक्रम मागे पडत होता. प्रकृतीत थोडी सुधारणा झाल्यामुळे ते गुरुवारी (20 ऑक्टोबर) महाविद्यालयात रुजू झाले, मात्र वर्गात शिकवत असतानाच अचानक त्यांची तब्येत खालावली व त्यात त्यांचा मृत्यू झाला. अल्फ्रेड 3 महिन्यांपूर्वीच तिथे रुजू झाले होते, आणि सुमित कुमार यांचं 2 वर्षांपूर्वीच लग्न झालं होतं. त्यांची पत्नी देखील शिक्षिका आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.