Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!
    • एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील
    • शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक
    • व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
    • पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!
    • रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात
    • नीट पेपरफुटी प्रकरणामागे सर्व भाजपचेच नेते
    • नीट पेपर फुटी प्रकरणात पेपर सेटर्सनीच केला घात!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»बापरे..! गणवेश वाटपात शिक्षकाने मागितले कमिशन
    ताज्या बातम्या

    बापरे..! गणवेश वाटपात शिक्षकाने मागितले कमिशन

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 8, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दिला जाणारा मोफत गणवेश म्हणजे शासनाचा सामाजिक न्याय व शैक्षणिक संधीतील समतेचा एक भाग आहे. मात्र या उपक्रमाला भ्रष्टाचाराची लागण झाल्याचे धक्कादायक वास्तव छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आले आहे. पैठण तालुक्यातील मौजे वडजी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने सरपंचाच्या नावे थेट गणवेश पुरवठादाराकडे १५ हजार रुपये कमिशनची मागणी केल्याचा आरोप समोर आला आहे. याबाबतची कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

    जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश पुरवठा केला जात असतो. मात्र या गणवेश प्रकरणात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात झालेल्या सदर प्रकरणात संबंधित शिक्षकाने एका शाळेसाठी गणवेश पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्याशी संपर्क साधला. यात प्रत्येक गणवेशामागे ठराविक रक्कम ‘कमिशन’ म्हणून मागितल्याचा उल्लेख या क्लिपमध्ये स्पष्टपणे ऐकू येतो. इतकेच नव्हे तर सरपंचाच्या नावे हे पैसे देण्याची सूचना करत सर्व सहकार्य करतो, पण साईडला पाहिजेच अशा स्वरूपाची भाषा त्यात वापरण्यात आली आहे.

    दरम्यान या प्रकारामुळे शैक्षणिक व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटपाचे उद्दिष्ट असताना त्यात भ्रष्टाचार होत असल्याने या योजनेचा मूळ हेतू हरवत असल्याची प्रतिक्रिया काही पालकांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांना अद्याप पूर्ण गणवेशही मिळाले नसताना शिक्षक आणि स्थानिक सत्ताधाऱ्यांच्या नावाने पैसे मागितले जात असल्याची चर्चा गावात सुरू झाली आहे.

    सदर प्रकरणाची चौकशी व्हावी, दोषींवर कठोर कारवाई करावी; अशी मागणी गावातील ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे सीईओ अंकित यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या या प्रकारामुळे संपूर्ण शिक्षक समाज संतप्त झाला आहे. सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली नाही; तर यापुढे शासकीय योजना राबवताना जनतेचा विश्वास उरणार नाही, अशी नाराजी पालकांमध्ये आहे. शिक्षण विभागाने तातडीने याची दखल घेऊन पारदर्शकता सुनिश्चित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!

    May 16, 2026

    ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप

    May 16, 2026

    जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

    May 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif