नियती गंभीर हिने पटकावले विभागीय ताक्वायंदो स्पर्धेत सुवर्ण पदक

0

लोकशाही न्युज नेटवर्क

धुळे येथे नुकत्याच झालेल्या विभागीय ताक्वायंदो स्पर्धेत पाचोरा येथील वर्ल्ड स्कुलची विद्यार्थींनी कु. नियती संजय गंभीर हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्ण पदक पटकावले आहे. नियती हिस क्रिडा शिक्षक शुभम चौधरी, बागुल सर, प्रशिक्षक सुनिल मोरे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. नियती गंभीर हिच्या यशाबद्दल वर्ल्ड स्कुलचे अध्यक्ष विशाल बिडकर, संचालक निखिल बिडकर, प्राध्यापिका साधना बिडकर यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे. नियती हिची आगामी राज्यस्तरीय ताक्वायंदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नियती हिचे परिसरातुन अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.