तरूणीकडून लग्नासाठी मानसिक छळ; तरूणाची नदीत उडी घेत आत्महत्या

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क

तरूणीकडून लग्नासाठी वारंवार होत असलेल्या मागणीच्या त्रासाला कंटाळून उंचदा येथील २५ वर्षीय तरूणाने पुर्णा नदीत उडी घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी तरूणीवर मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथील रहिवाशी अजय सिताराम इंगळे (वय २५) हा आपल्या परिवारासह राहतो. त्याच्या गावातील २८ वर्षीय तरूणीने गेल्या काही महिन्यांपासून तिच्याशी लग्न करावे अशी मागणी करत होती. याला अजय नकार दिला होता. लग्नासाठी वारंवार होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून अजयने ८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास खामखेडा पुलाच्या पुर्णा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्‍कादायक घटना उघडकीस आली आहे.

अजयला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मयताच्या भाऊ मनोज इंगळे यांच्या फिर्यादीवरून तरूणीवर मुक्ताईनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदिप शेवाळे करीत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here