तुकारामवाडीमध्ये तरुणावर कोयत्याने वार ; दोघांवर गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील तुकाराम वाडीतील हनुमान मंदीराजवळ भांडण करू नका असे म्हणाल्याच्या राग आल्याने दोन जणांनी तरूणाच्या डोक्यात कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

तुकारामवाडीमधील दत्त मंदीराजवळ आकाश गोकूळ पारे (वय २५) हा कुटुंबियांसह राहतो. हनुमान मंदीराजवळ गोल्या ठाकूर ( रा. जैनाबाद ) आणि विशाल चौधरी ( रा. शंकरराव नगर ) या दोघांचा वाद सुरू असतांना आकाश पारे हा तिथे आला. यावेळी तो म्हणाला की, ‘तुम्ही वाद का करता’ याचा राग आल्याने गोल्या ठाकूर याने त्याच्या कमरेला लावलेल्या कोयत्याने आकाशच्या डोक्यावर वार केले.

दरम्यान आकाश गंभीर जखमी झाला. तसेच विशाल चौधरी याने शिवीगाळ करून मी तुला पाहून घेईन अशी धमकी देखील दिली. याप्रकरणी आकाश पारे याच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी गोल्या ठाकूर आणि विशाल चौधरी यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पुढील तपास पोहेकॉ योगेश सपकाळे करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.