Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!
    • लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राष्ट्रीय»तरुण तेजपाल लैंगिक अत्याचार प्रकरणात दोषी
    राष्ट्रीय

    तरुण तेजपाल लैंगिक अत्याचार प्रकरणात दोषी

    २०१३ तहलका प्रकरणात मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 6, 2026No Comments175 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क 

    ‘तहलका’चे माजी संपादक इन चीफ तरुण तेजपाल यांना मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठाने मोठा झटका दिला. तरुण तेजपाल यांना २०१३ च्या लैंगिक अत्याचार प्रकरणात कोर्टाने दोषी ठरवले. मे २०२१ मध्ये सत्र न्यायालयाने दिलेल्या निर्दोष मुक्ततेच्या निकालाला आव्हान देणारे गोवा सरकारचे अपील स्वीकारत हायकोर्टाने सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द केला. हायकोर्टने तरुण तेजपाल यांना या बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले.

    अतिरिक्त सत्र न्यायालयाने मे २०२१ मध्ये दिलेल्या ५२७ पानांच्या विस्तृत निकालाला राज्य सरकारने हायकोर्टात आव्हान दिले होते. सत्र न्यायालयाने पुराव्यांचे मूल्यांकन करताना गंभीर चुका केल्या आणि पीडितेच्या साक्षीची तपासणी करताना चुकीचा दृष्टिकोन स्वीकारला, असा युक्तिवाद राज्य सरकारतर्फे करण्यात आला होता. २०२१ च्या गोवा सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालामध्ये त्यांना संशयाचा फायदा घेऊन निर्दोष मुक्त करण्यात आले होते. गोवा सरकारने तरुण तेजपाल यांच्या कोठडीची मागणी केली.

    नोव्हेंबर २०१३ मध्ये गोव्यातील बांबोळी येथील ‘ग्रँड हयात’ हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका थिंकफेस्ट कार्यक्रमादरम्यान हॉटेलच्या लिफ्टमध्ये तेजपाल यांनी आपल्या एका माजी कनिष्ठ सहकाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. ७ आणि ८ नोव्हेंबर २०१३ च्या रात्री या घटना घडल्याचा आरोप होता. माध्यमांमधील वृत्तानंतर गोवा पोलिसांनी या प्रकरणाची प्राथमिक चौकशी सुरू करून गुन्हा दाखल केला आणि आरोपपत्र दाखल केले. तथापि, २१ मे २०२१ रोजी सत्र न्यायालयाने आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचे नमूद करत तेजपालची सर्व आरोपांतून मुक्तता केली होती.

    संपूर्ण घटनाक्रम

    ७ नोव्हेंबर २०१३ (रात्र)
    बांबोळी येथील ग्रँड हयात हॉटेलच्या ब्लॉक ७ मधील गेस्ट लिफ्टमध्ये पहिली कथित घटना घडली. आरोपीने पीडितेला लिफ्टमध्ये बेकायदेशीरपणे रोखून धरून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप.

    ८ नोव्हेंबर २०१३
    त्याच हॉटेलच्या ब्लॉक ७ मधील उजव्या बाजूच्या गेस्ट लिफ्टमध्ये दुसरी कथित घटना घडली. आरोपीने पुन्हा पीडितेला रोखून धरत तिचे चुंबन घेऊन, ड्रेस वर करून विनयभंग केल्याचा आरोप.

    २१ नोव्हेंबर २०१३
    घटनेबाबतची माहिती प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली. या वृत्तांची दखल घेत व पीडितेच्या ईमेल तक्रारीच्या आधारे गोवा पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली.

    २४ फेब्रुवारी २०१४
    पणजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात हे प्रकरण अधिकृतपणे नोंदवले गेले.

    २१ मे २०२१
    पणजी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने तरुण तेजपाल यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता करणारा निकाल दिला.

    ६ ऑगस्ट २०२६
    मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सत्र न्यायालयाचा निर्दोष मुक्ततेचा निकाल केला रद्द आणि ठरवले दोषी.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे

    September 11, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!

    September 11, 2026

    आईसोबतच्या मैत्रीचा राग; रेल्वे कर्मचाऱ्याला संपवले

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif