सावळदे तापी पुलावरून नदीपात्रात तरुणाने घेतली उडी

0

शिरपूर , लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकाने तापी नदीपात्रात आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आज गुरुवारी सकाळी उघडकीस आला असून युवकाचा मृतदेह तापी नदी पात्रात आढळल्याने खळबळ उडाली आहे. हॉटेल व्यावसायिक असलेल्या द्रसिंग रजेसिंग राजपूत (वय ४२) असे मयत युवकाचे नाव असून ते शिरपूर तालुक्यातील दहिवद हॉटेल आईसाहेबचे संचालक आहेत. आत्महत्याचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

शिरपूर तालुक्यातील दहिवद हॉटेल आईसाहेबचे संचालक चंद्रसिंग ऊर्फ (सर्विन) रजेसिंग राजपूत हे गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होते. याबाबत शिरपूर तालुका पोलीस स्टेशन बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती.

त्यांचा सर्व शोध सुरु असतांना सावळदे तापी पुलावर त्यांची मोटरसायकल आढळून आली होती.त्यावरून चनद्रसिंग ऊर्फ सर्विन यांनी तापी नदीत आत्महत्या केल्याचा संशय असून बुधवार पासून तापी नदीपात्रात शोध सुरु होता. गुरूवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळला .त्यांच्या आत्महत्याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट नसून त्यांच्या पश्चात आई,पत्नी मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी शिरपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.