ब्रेकिंग.. तानाजी सावंतांचा मुलगा पुणे विमानतळावरून गायब
अपहरणाची शक्यता ?, पोलिसांनी केला वेगळाच दावा
पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क
माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत हे पुणे विमानतळावरून गायब झाल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पुणे पोलीस विमानतळावर दाखल झाले असून, तपास सुरू केला आहे. दुपारी ड्रायव्हरला विमानतळावर सोडायला लावलं होतं, त्यानंतर त्या ठिकाणाहून ऋषीराज सावंत हे बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांचं अपहरण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पोलीस काय म्हणाले ?
माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत हे पुण्यातून बेपत्ता आहेत. पुणे विमानतळावरून त्यांचं अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे पोलिसांकडून वेगळाच दावा करण्यात येत आहे. मुलगा बँकॉकला गेला आहे, त्यामुळे फोन बंद लागतोय, असा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे. माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे या प्रकरणात पोलीस यंत्रणेकडून माहिती घेत आहेत.