Friday, May 20, 2022

पारोळ्यात तमाशा मंडळातील तरुण-तरुणीची आत्महत्या

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

पारोळा येथे एक धक्कादायक घटना समोर आलीय. तमाशा मंडळातील तरुणी व तरुणाने विषारी द्रव सेवन करून आत्महत्या केल्याची घटना पारोळा शहरात घडली. अंजली अशोक नामदास (वय २०, रा. दत्त कॉलनी, भुसावळ) व योगेश उर्फ सुनील नामदेव बोरसे (वय १९, रा. अंजाळे, ता. यावल) अशी दोघा मयतांची नावे आहेत.

- Advertisement -

भिका-नामा तमाशा मंडळ हे धुळे जिल्ह्यातील बाबुळवाडी येथून येथे दि. २४ रोजी दुपारी तमाशाचे काम आटोपून दुसऱ्या ठिकाणी जात होते. पण पारोळा शहरातील कजगाव रोडवरील पेट्रोल पंपाजवळ वाहन नादुरुस्त झाल्याने थांबले होते. तमाशा मंडळातील तरुणी अंजली अशोक नामदास व योगेश उर्फ सुनील नामदेव बोरसे हे दोन्ही तमाशा मंडळातच काम करतात.

दोघे बाजारात जाऊन येतो, असे सांगून निघून गेले. ते लवकर न आल्याने मंडळातील अन्य सहकाऱ्यांनी शोध घेतला. तेव्हा ते बाजारात होते. त्यावेळी त्यांना विचारपूस केली असता एवढा वेळ का लागला? त्यांनी सांगितले की आम्ही दोघांनी काहीतरी विषारी औषध सेवन केला आहे, असे सांगितले.

दरम्यान, दोघांना सहकाऱ्यांनी लगेच एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यानंतर २५ रोजी पुढील उपचारार्थ पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. तेव्हा अंजलीची प्राणज्योत दुपारी दोनला मालवली, तर योगेशचा सायंकाळी सहाला मृत्यू झाला. याबाबत दोघांच्या नातेवाईकांनी पारोळा पोलिसात खबर दिली. मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या