तळवेलजवळ अपघात; एक ठार, एक जखमी

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

वरणगाव दिपनगर येथील मेक्सो कंपनीतील सुरक्षा रक्षकाचे काम आटोपून रात्री दहा वाजेच्या सुमारास तळवेल येथे मोटर सायकलने घरी जात असताना स्विफ्ट कारने जोरदार धडक दिल्याने एक ठार आणि एक जखमी झाल्याची घटना घडली.

भुसावळ तालुक्यातील तळवेल येथील रहिवाशी व दिपनगर येथील मेक्सो कंपनीत सुरक्षारक्षक असलेले रविंद्र सुकदेव इंगळे (वय ५२) व पवन ढमढेरे हे दोघे विज केंद्रातून आपले कर्तव्य आटोपून मोटर सायकल क्र. एम. एच. १९ सी. एम. ८५६२ वरून तळवेल येथे घरी परत जात असताना गावाजवळ वळण घेत असताना मुक्ताईनगरकडून येणारी भरधाव स्विफ्ट कार क्र. एम. एच. १९ सी. वाय. ६४९६ ने मोटर सायकला जोरदार धडक दिल्याने मोटर सायकल स्वार रविंद्र इंगळे हे जागीच ठार झाले तर बस बसलेले पवन ढमढेरे हे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मयत रविंद्र सुकदेव इंगळे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. याबाबत वरणगाव पोलीसात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here