तळवेल शिवरात बेवारास तरुणाचा मृतदेह आढळला

0

वरणगाव ;- भुसावळ तालुक्यातील तळवेल शेती शिवारातील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या शेतात एका तरुणाचा बेवारस कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली असुन मृत तरुणाची ओळख अद्याप पटली नाही

याबाबत असे की तालुक्यातील तळवेल शेती शिवरातील गट न २६५ मधील ग्रामपंचायतीच्या मालकीचे लिलाव पद्धतीने मक्त्याने करणाऱ्या जितेंद्र विजय पाटील यांनी केलेल्या शेतात गहु लागवड केली असल्याने रविवार दि ९ रोजी सकाळच्या सुमारास गव्हाला पाणी देण्यासाठी शेतात गेलेले असल्याने एका पस्तीस ते चाळीस वर्षे वयोगटाच्या तरुणाचा अंगावर एकही कपड नसलेला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह त्यांच्या नजरेस पडताच त्यांनी तात्काळ पोलीस पाटील यांना मिहीती दिल्याने त्यांनी वरणगाव पोलीसांना खबर देतात घटनेचा पंचनामा केला

मृत व्यक्ती वेडसर असल्याची चर्चा

तळवेल ते बोहर्डी रस्त्यावर (पन्नासीचा रस्ता ) गेल्या आठ ते दहा दिवस एक वेडसर तरुण या रस्त्याने दहा दिवसां पुर्वी पायी फिरताना या बऱ्याच शेतकऱ्यांना दिलासा होता व जेवण मागायाचा मात्र तीन चार दिवस तो तरुण त्यांना दिसला नसल्याने तो मृत तरुण तो असल्यासच पाहिजे असा . अदाज लावला जात आहे हिंसक प्राण्याने शरीराचे लच्चके तोडल्याने ओळख पटवू शकली नाही

Leave A Reply

Your email address will not be published.