Wednesday, August 10, 2022

१० हजाराची लाच स्वीकारतांंना तलाठी जाळ्यात

- Advertisement -

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई न करण्याच्या मोबादल्यात १० हजाराची लाच स्विकारणाऱ्या देवगावच्या तलाठ्याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचुन रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे महसुल विभागात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

- Advertisement -

तक्रारदार हे चोपडा तालुक्यातील आहे. तक्रारदार यांचे वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर आहे. ट्रॅक्टरवरती तापी नदीमधुन वाळू वाहतूक करू देणेसाठी व वाहनावर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे देवगाव येथील तलाठी भुषण विलास पाटील (वय ३२, रा. पंकज नगर चोपडा) याने दर महिन्याला १० हजाराची मागणी केली. आज चोपडा तहसील आवारात असतांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचला त्यानुसार तक्रारदार यांनी मागणीनुसार पहिला हप्ता म्हणून १० हजार रूपये घेतांना रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे चोपडा तहसील कार्यालयात खळबळ उडाली आहे.

लाचलुचपत विभागाचे जिल्हा पोलीस उपअधिक्षक शशिकांत पाटील, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, स.फौ. सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ यांनी कारवाई केली.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या