टाकळीतील १९ वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल ..
चाळीसगाव (प्रतिनिधी) – टाकळी गावात राहणाऱ्या १९ वर्षीय युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या संदर्भात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वीरेश जगदीश पटेल (वय १९) असे सदर तरुणाचे नाव असून, त्याने आपल्या राहत्या घरात ही टोकाची कृती केली. ही घटना लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी त्याला तातडीने चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात असून, आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.