Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम
    • ‘या’ प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ इम्तियाज जलील!
    • पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन; जनता मात्र संतप्त..
    • जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!
    • रुपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी
    • भारताचा अभिमान : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन!
    • बापरे! कार कोसळली ३०० फूट खोल दरीत
    • भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»लोकशाही विशेष»“तिळ गुळ घ्या, गोड गोड बोला”
    लोकशाही विशेष

    “तिळ गुळ घ्या, गोड गोड बोला”

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 14, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    मकर संक्रांत विशेष लेख

    आज मंगळवार दि. १४/०१/२०२५ या दिवशी मकरसंक्रांतीचा पुण्यकाल.. या मुहुर्तावर हा सण सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत साजरा होणार आहे. प्रत्येकजण या सणाची आतुरतेने वाट बघत आहे. आपआपल्या परीने तयारी करत आहे. या संक्रांतीच्या सणात प्रत्येक मानव हा आपले शेजारी, मित्र, नातेवाईक, परिचयाचे व्यक्ती यांना तिळगुळ देतो व गळाभेट घेतो, त्याचप्रमाणे तो एवढ्यावरच थांबत नाही, तर त्यांना तिळगुळ दिल्यानंतर वर्षभर काय तर आयुष्यभर कधीही माझ्याशी न भांडण्याचे वचन घेत असतो, व समोरच्याही व्यक्तीला तिळगुळ घेतांना ते वचन पाळावेच लागते.

    परंतु हे वचन वर्षभर, आयुष्यभर खरोखरचं पाळले जाते का? या गोष्टीचा काळजीपूर्वक विचार करणे खूप महत्त्वाचे आहे. कारण आजच्या धकाधकीच्या जीवनात जर डोकावून बघीतले तर प्रत्येक व्यक्ती हा स्वार्थी, मतलबी झालेला आहे. कारण महागाईच आकाशाला गवसणी घालत आहे. त्याचप्रमाणे आपल्या घरातील, कुटुंबातील सदस्यांचे पालन-पोषण करणे, त्यांची सर्व प्रकारची जबाबदारी पूर्ण करणे, त्यांचे महागडे शिक्षण पूर्ण करणे, क्लास, शिकवण्या ई. चे त्यांचे खर्च पेलणे, हे जिकरीचे झालेले आहे.

    त्याचप्रमाणे, इतकेच नव्हे तर आजच्या या धकाधकीच्या जीवनात मानव आपल्या जन्मदात्या आई – वडीलांनाच विसरून गेलेला आहे. आई – वडील आपल्या मुलांना जन्म देतात, हे जग दाखवितात, त्याचप्रमाणे त्यांच्यावर लहानपणापासून त्यांच्या कपड्या लत्यांवर, शिक्षणावर, खाण्या पिण्यावर पाण्यासारखा पैसा खर्च करतात, व त्यांनाच आजच्या वर्तमान काळातील, २१ व्या शतकातील, संगणकीय युगातील मुले विसरतात.

    मुलगा जोपर्यंत आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत त्याचे संगोपन करणे, त्याला सांभाळणे हे प्रत्येक आई – वडीलांचे कर्तव्य असते. व एकदा का मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहिला की, त्या दिवसापासून त्याचे आई – वडील मरेपर्यंत त्यांचा सांभाळ करणे, त्यांचे संगोपन करण्याची सर्वस्व जबाबदारी ही मुलाची असते. परंतु एकदा का मुलगा बायकोच्या पदरात अडकला की तो आपल्या जन्मदात्या आई – वडीलांनाच विसरतो व एकतर त्यांच्या पासून विभक्त होतो किंवा त्यांची रवानगी वृध्दाश्रमात किंवा आश्रमात करतो अशा संततीला म्हणावे तरी काय? त्यापेक्षा अशी संतती जन्माला न घातलेलीच बरी व मुलं न झालेलेच चांगले असो..

    परंतु माझ्या मते, आपल्याला सर्वप्रथम आई – वडीलच महत्त्वाचे वाटावयास हवे. कारण त्यांच्याच मुळे तर आपण हे जग बघत असतो.

    हेमंत वसंतराव चौधरी
    चाळीसगाव, जि. जळगाव.
    मो. ९८९०७०३४८५

    Makar Sankranti
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    भारताचा अभिमान : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन!

    May 11, 2026

    निवडणुकीत होणारी हिंसा अयोग्य

    May 7, 2026

    लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज!

    May 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif