उन्हाळा आला.. आता आरोग्य सांभाळा !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

येत्या 8-10 दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने उन्हाळा सुरू होईल. आतच अनेक भागात 38 ते 41 अंश सेल्सिअस तापमान झाले आहे.
उन्हाळ्यात आपण कोणते कपडे घालावेत, आरोग्याची कशी काळजी घ्यावी, त्वचाची कशी काळजी घ्यावी, हे आपण आज जाणून घेणार आहोत.

उन्हाळ्यात असे कपडे परिधान करा

● सुती -कॉटन किंवा लीननचे कपडे

उन्हाळ्यात सहसा सुती (कॉटन) साड्या, लीननच्या साड्या, सुती (कॉटन) कुर्ती, कॉटन ड्रेस वापरावेत. सुती कपड्यात उन्हाळ्यात येणारा घाम शोषला जातो तर सिल्क, सिन्थॅटिक आणि नायलॉन सारखे कपड्यात घाम शोषला जात नाही म्हणून असे कपडे उन्हाळ्यात वापरू नका.

● पांढऱ्या रंगाचे कपडे

उन्हाळ्यात काही कामानिमित्ताने घराबाहेर जायचे असल्यास शक्यतो पांढऱ्या रंगाचे कपडे वापराने योग्य असते, कारण पांढऱ्या रंगावर सूर्य किरणे पडून ती परावर्तित होऊन वातावरणात असलेली उष्णता कमी जाणवते. पांढरे कपडे नसल्यास फिकट रंगाचे वापरावे. गडद रंगाचे कपडे उन्हात जातांना घालू नये.

● सैल कपडे

उन्हाळामध्ये अतिशय सैल कपडे परिधान करावे कारण त्यांचे सुत (फॅब्रिक) तुमच्या अंगाला कमी प्रमाणात लागेल व त्यामुळे शरीर जास्त गरम होणार नाही.

● दागिन्यांचा कमी वापर

उन्हाळ्यात आपण जास्त प्रमाणात दागिने घातल्यास ते शरीराची जास्त जागा व्यापून घेतात म्हणून बारीक मंगळसुत्र व ईअर रिंग्स व्यतिरिक्त इतर दागिने घालू नका. फक्त लग्न समारंभ असेल तर त्या प्रसंगी चकोर, चपला हार इत्यादी दागिने घालावेत. दागिन्यांच्या धातूमुळे सुद्धा थोड्या प्रमाणात शरीर गरम होते म्हणून उन्हाळ्यात मेटलच्या दागिन्यांपेक्षा प्लॅस्टिकचे दागिने वापरणे योग्य असते.

● कॉटनचे सनकोट, संपूर्ण चेहरा व हात झाकले जाईल असा रुमाल

हल्ली मार्केटमध्ये खास उन्हाळ्यात घालण्यासाठी लेडीजसाठी कॉटनचे सनकोट, कॉटनची टोपी, संपूर्ण चेहरा व हात झाकले जाईल असे कॉटनचा रुमाल मिळतो तो घालून उन्हाळ्यात बाहेर जातांना वापरावे.

● छत्रीचा वापर

उन्हाळ्यात बाहेर जातांना सहसा लाईटरंगाचे कापड असलेली छत्री वापरावी व जास्त ऊन असल्यास कान रुमालाने झाकून घ्यावे. काळ्या रंगांची छत्री सहसा वापरू नये

विलासराव असोदेकर काका, भुसावळ

Leave A Reply

Your email address will not be published.