Wednesday, February 1, 2023

टेबल फॅनचा शॉक लागून ३४ वर्षीय आचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

- Advertisement -

 

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क; शहरातील श्रीराम चौक भागात वास्तव्यास असलेल्या एका ३४ वर्षीय अविवाहित युवकाचा टेबल फॅनचा शॉक लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि. १४ जुलै रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. सदर घटनेप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बुऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथुन मजुरी करण्यास आलेला दिपक संतोष महाजन (वय – ३४) हा येथील भडगाव रोडवरील चंद्रलोक चायनीज अॅण्ड पावभाजी सेंटर मध्ये आचारीचे काम करुन आपला व आपल्या आईचा उदरनिर्वाह करत होता. दरम्यान दि. १३ जुलै रोजी दैनंदिन काम आटोपून दिपक हा पाचोरा शहरातील श्रीराम चौकात वास्तव्यास असलेल्या खोली मध्ये परतला. दि. १४ जुलै रोजी दिपक हा हॉटेलमध्ये कामावर न आल्याचे मालकास कळाल्यानंतर मालकाने दिपकच्या खोलीवर जावुन चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र खोलीचा दरवाजा आतुन बंद होता. हॉटेल मालकाने इतरांच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता दिपक हा निपचित पडलेल्या अवस्थेत व त्याचा हात हा खोली मधील टेबल फॅनला आवळलेल्या स्थितीत आढळून आल्याने दिपक यास तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी दिपक यास मृत घोषित केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे