चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
जिल्ह्यातील भद्रावती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भंगाराम वार्डात एक तरुण स्टीलची धारदार तलवार बाळगून लोकांमध्ये दहशत निर्माण करत असल्याच्या माहितीवर स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरच्या पथकाने काल मोठी कारवाई केली आहे. भद्रावती शहरातील भंगाराम वार्डातील गौरव उर्फ गुरु मोहन जाधव (वय 29) याच्याकडून तलवार जप्त करण्यात आली असून त्यांच्यावर भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी भद्रावती परिसरात अवैध धंद्यांविरोधात पेट्रोलिंग करत होते. या दरम्यान गौरव जाधव आपल्या घरासमोर तलवार घेऊन अस्ववस्थ वातावरण निर्माण करत असल्याचा तपशील समोर आला. प्रसंगी तत्काळ त्याला ताब्यात घेऊन तलवारही जप्त करण्यात आली.
या कारवाईत एपीआय बलराम झाडोकर, पीएसआय सर्वेश बेलसरे, पोलीस हवालदार जय सिंह, गणेश मोहुर्ले, संतोष येलपूलवार, नितीन रायपुरे, पो. अ. मिलिंद जांभुळे आणि चा. पो. अं. ऋषभ बारसिंगे यांचा समावेश होता.
स्थानिक पोलीस दलाने अवैध आणि हिंसक घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी चालविलेल्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, भद्रावती भागातील नागरिकांना अशा अनैतिक आणि हिंसक कृत्यांपासून सुरक्षित ठेवण्याचा कटिबद्धतेचा आग्रह पुन्हा एकदा व्यक्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर पोलीस सातत्यपूर्ण प्रयत्नांनी गुन्हेगारी प्रतिबंध व लोकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कार्यरत असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
ही कारवाई परिसरातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाची असून, स्थानिक नागरिकांमध्ये पोलिसांची जागरूकता व विश्वास वाढविण्यास मदत करणारी आहेत.