Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»आरोग्य»देशात स्वाइन फ्लू (H1N1) पसरतोय वेगाने
    आरोग्य

    देशात स्वाइन फ्लू (H1N1) पसरतोय वेगाने

    मंत्री किरोडीलाल मीणा यांनाही संसर्ग : रुग्णसंखेत वाढ
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 26, 2026No Comments225 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    देशात स्वाइन फ्लू (H1N1) चे रुग्ण वेगाने वाढत आहेत. सर्वत्र लोक खोकला, सर्दी आणि तापाने फणफणले आहेत. राजस्थानचे कृषीमंत्री किरोडीलाल मीणा यांनाही याचा संसर्ग होऊन आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना सवाई मान सिंह रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये भरती करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी बुधवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की मीणा यांनी काही दिवसांपूर्वी स्वाइन फ्लूची चाचणी करून घेतली होती आणि अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी रात्री उशिरा त्यांना आयसीयूमध्ये भरती करण्यात आले.

    संसर्गाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी मंत्र्यांना लोकांशी किंवा कुटुंबीयांशी भेट न देण्याचा सल्ला दिला आहे. एसएमएस मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. दीपक माहेश्वरी यांनी सांगितले की मीणा यांचा उपचार स्वाइन फ्लू प्रोटोकॉलनुसार केला जात आहे. आवश्यक चाचण्या केल्या जात आहेत आणि मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. महेंद्र अग्रवाल यांच्या देखरेखीखाली तयार झालेल्या टीमने त्यांच्यावर लक्ष ठेवले आहे.

    महाराष्ट्रात ३०० हून अधिक

    देशाच्या काही भागांत स्वाइन फ्लू आणि इन्फ्लूएंझाचे रुग्ण वेगाने वाढले आहेत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत हा संसर्ग वेगाने पसरत आहे. येथे २००० हून अधिक H1N1 चे रुग्ण नोंदवले गेले आहेत. इतर राज्यांचा विचार केल्यास महाराष्ट्रात ३०० हून अधिक रुग्ण समोर आले आहेत. तर उत्तराखंड, गुजरात आणि मध्य प्रदेशातही संसर्गाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत.

    डॉक्टरांचा सल्ला

    बहुतेक रुग्ण सौम्य स्वरूपाचे आहेत, तरीही वृद्ध आणि उच्च जोखीम असलेल्या रुग्णांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की खोकला, ताप, घसा खवखवणे आणि शरीरात तीव्र वेदना यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. हात स्वच्छ ठेवणे, मास्क आणि स्वच्छतेची काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसताच ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

    आयसीएमआरच्या मते, देशात H1N1 चे रुग्ण काही काळापूर्वी वाढले होते, पण आता त्यात हळूहळू घट होत आहे. दिल्लीतही गेल्या चार-पाच आठवड्यांत संसर्गाचे रुग्ण जास्त होते. मात्र गेल्या सुमारे दोन आठवड्यांत रुग्णांमध्ये घट दिसून आली आहे. या आठवड्याच्या आकडेवारीची अजून वाट पाहिली जात आहे. राजधानी दिल्लीत आतापर्यंत सुमारे ६५० फ्लूचे रुग्ण नोंदवले गेले आहेत.

    दिल्लीत फ्लूचे रुग्ण वाढत असल्याने दिल्ली सरकारने आरोग्यविषयक सल्लापत्रिका जारी केली आहे. सरकारने लोकांना आवाहन केले आहे की श्वसनासंबंधी स्वच्छतेचे पालन करावे, गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहावे आणि लक्षणे दिसताच वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाक झाकावे, हात साबण आणि पाण्याने सतत धुवावेत, गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावा. यासोबतच श्वसनासंबंधी आजाराने पीडित लोकांशी जवळचा संपर्क टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच लोकांना डोळे आणि नाकाला हात न लावणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये आणि जास्त प्रमाणात द्रव पदार्थ घेण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    कोणत्याही परिस्थिती हा कायदा लागू केला जाणार नाही!

    September 15, 2026

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif