सामुहिक राष्ट्रगान करुन “स्वराज्य महोत्सव” साजरा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

आज धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय आणि शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयात भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने “स्वराज्य महोत्सव” निमित्त सामुहिक राष्ट्रगीत गायन कार्यक्रमाचे आयोजन करुन स्वराज्य महोत्सव साजरा करण्यात आला.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संचालक राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या निर्देशानुसार लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव आणि शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत “आजादी का अमृत महोत्सव” ९ ऑगस्ट २०२२ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत साजरा होत आहे.

आज महाविद्यालयात क्रांती दिन, विश्व आदिवासी दिवस निमित्ताने थोर स्वातंत्र्य सेनानी धनाजी नाना चौधरी यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ. राकेश चौधरी यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. आणि महाविद्यालय परिसरात प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे, प्राचार्य डॉ. राकेश चौधरी, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विभागीय समन्वयक डॉ. नितीन बडगुजर, जेष्ठ प्राध्यापक डॉ. यशवंत महाजन कार्यक्रम, अधिकारी डॉ. निलेश शांताराम चौधरी, डॉ. मिलिंद काळे यांनी वृक्षारोपण करून विश्व आदिवासी दिवस साजरा करण्यात आला.

याप्रसंगी प्रोफेसर डॉ. उमेश वाणी, डॉ. योगेश महाजन, डॉ. प्रशांत भोसले, डॉ. सुनिता चौधरी, डॉ. कल्पना भारंबे, डॉ. भुषण राजपूत, कार्यालयीन अधीक्षक धनंजय महाजन, अमोल पाटील, ग्रंथपाल किशोर भोळे, सहाय्यक ग्रंथपाल गायत्री असोदेकर, साह्ययक कार्यक्रम अधिकारी डॉ. अशोक हनवते, डॉ. रविंद्र लढे डॉ. जुगल घुगे, वरिष्ठ महाविद्यालय, डॉ. प्रमोद चौधरी (क्रीडा संचालक), सुनील पाटील (ग्रंथपाल), डॉ. राजकुमार लोखंडे (विद्यार्थी विकास अधिकारी), डॉ. संदीप जोशी, प्रा. प्रियंका बऱ्हाटे, प्रा. अनिल सोनवणे, कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्या प्रीती बोन्डे, रेखा भोळे, देवयानी पाटील, वासंती ढाके, रवींद्र पवार,  वनिता नेमाडे, शिक्षक व कर्मचारी सचिन महाजन, मनोज पाटील, दीपक पाटील, संदीप पाटील, दिनेश चौधरी, सुनील जोशी, सरोदे, विजय पाटील, राजकुमार पवार, योगेश महाजन, सियाराम बारेला, चेतन नारखेडे यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.