धक्कादायक; प्रसिद्ध सुवर्ण मंदिरात लाखोंची चोरी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

अमृतसरमधील प्रसिद्ध सुवर्ण मंदिरातील लाखो रुपयांची चोरी झाल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. गुरु नानक जयंतीच्या एक दिवसाआधी चोरीची घटना घडलीय. दरम्यान चोरीची घटना मंदिरातच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणाची नोंद घ्यावी आणि या चोरीचा तपास करावा अशी गोल्डन टेम्पलमधील कर्मचाऱ्यांनी केलीय. तसेच चार संशयितविरोधात तक्रार नोंदवण्यात आली.

चोरीची घटना गिल्डान टेम्पलमध्ये रविवारी सायंकाळी घडली. चोरटयांनी गोल्डन टेम्पलमधील दान पेटीतून तब्बल एक लाख रुपये लंपास केले. टेम्पलमधील कर्मचाऱ्यांनी पुरावा म्हणून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज दाखवले. या फुटेजमध्ये एक व्यक्ती देणगीच्या कच्च्या पावत्या फडात असल्याचं दिसत आहे. सीसीटीव्हीमध्ये दिसणारा व्यक्ती देणगी देण्याचा बनाव करतांना दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.