Sunday, November 27, 2022

गर्भवती विवाहितेचा संशयास्पद मृत्यू ; घातपाताचा आरोप

- Advertisement -

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

धरणगाव (Dharangaon) शहरातून खळबळजनक घटना घडली आहे. धरणगावातील हनुमान नगर परिसरात आज सकाळी विवाहितेच्या संशयास्पद मृत्यू (Suspicious Death) झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

- Advertisement -

कोमल संजय महाजन (वय 23) असे मयत विवाहितेचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे मयत 6 महिन्यांची गर्भवती (pregnant ) होती. दरम्यान घातपात झाल्याचा आरोप मयत विवाहितेच्या नातेवाईकांनी केला आहे.

शहरातील हनुमान नगरमध्ये आज सकाळी कोमल महाजन या विवाहितेचा मृतदेह गळफास (suicide) घेतलेल्या अवस्थेत घरात आढळून आला. मात्र आपल्या मुलीने आत्महत्या नव्हे तर तिचा घातपात झाल्याचा आरोप मयत विवाहितेच्या नातेवाईकांनी केला आहे. मयत कोमल 6 महिन्यांची गर्भवती होती. मागील दोन वर्षांपूर्वी तिने पती निलेश सोबत प्रेमविवाह (love marriage) केलेला होता.

दरम्यान मयत कोमलच्या मृतदेहाची इनकॅमेरा चौकशीची मागणी नातेवाईकांनी केली आहे. घटनास्थळी डीवायएसपी रावले, सपोनि जीभाऊ पाटील, पीएसआय अमोल गुंजाळ, पोहेका विनोद संदानशिव, विजय धनगर यांच्यासह इतर कर्मचारी हजर होते.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या