Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राष्ट्रीय»अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    राष्ट्रीय

    अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग

    जर्मनीहून दिल्लीकडे निघालेल्या विमानाला जयपूरमध्ये करण्यात आले.
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 14, 2026Updated:October 14, 2026No Comments193 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    फ्लायदुबईची घटना ताजी असतानाच एअर इंडियाच्या विमानाबद्दल धक्कादायक बातमी पुढे येतंय. जर्मनीतील फ्रँकफर्टहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या एका विमानाचे आपत्कालीन लँडिंग जयपूर येथे करण्यात आले. विमान हायजॅक झाल्याच्या वृत्तानंतर हे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. ज्याने मोठी खळबळ उडाली. मात्र, सुरक्षा यंत्रणांच्या तपासणीत ती बातमी अफवा असल्याचे निष्पन्न झाले. पण प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळाले. यंत्राना अलर्ट मोडवर आल्या. अहमदाबादमधील एअर ट्रॅफिक कंट्रोलला (ATC) सकाळी 9 वाजून 05 मिनिटाला एअर इंडियाच्या AI 2030 या विमानाबाबत आपत्कालीन सूचना मिळाली. त्यानंतर दिल्लीकडे न जाता विमानाची दिशा बदलून विमानाला जयपूरकडे वळवण्यात आले.

    जयपूरला विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. या विमानाने काल रात्री 10 वाजून 45 मिनिटाला उड्डाण केले होते. विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आल्याने विमानतळावरही घबराटीचे वातावरण होते. विमानतळावरील सुरक्षा व आपत्कालीन कार्यपद्धती कार्यान्वित करण्यासोबतच जयपूर पोलिसांचे बॉम्ब शोधक व नाशक पथक, अग्निशमन दल आणि इतर अनेक पथके घटनास्थळी दाखल झाली. राजस्थान पोलिसांचे अतिरिक्त महासंचालक यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारीही विमानतळावर पोहोचले होते.

    सर्व सुरक्षा योजना अगोदरच तयार ठेवण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार, विमान मुंबई फ्लाईट इन्फॉर्मेशन रिजनमध्ये असताना वैमानिकाने स्क्वॉक कोड 7500  प्रविष्ट केला. हा कोड वैमानिकांकडे फक्त बेकायदेशीर हस्तक्षेप किंवा विमान अपहरणाचे संकेत असतील त्यावेळीच दिला जातो. हा कोड वैमानिकांनी पाठवल्याने खळबळ उडाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोईंग 787-9 विमानाद्वारे चालवल्या जाणाऱ्या एआय 2030 या विमानाने जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केले आणि त्यानंतर सुरक्षेच्या तपासणीसाठी ते आयसोलेशन बेमध्ये हलवण्यात आले.

    मालवीय नगरचे सहाय्यक पोलीस आयुक्त शिव दयाल यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, बॉम्बची धमकी मिळाल्यामुळे फ्रँकफर्ट-दिल्ली विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते. त्यानंतर विमानाची सर्व तपासणी करण्यात आल्याची माहिती मिळतंय. दुबईकडून तेल अवीवकडे निघालेल्या विमानात धक्कादायक घटना घडली. थेट को पायलटने हल्ला करत पायलटला जखमी केले आणि विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न केला.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    महाराष्ट्रासह ७ राज्यांत एसआयार मुदतवाढ

    November 7, 2026

    E-20 पेट्रोल 420 इंधन : थेट पुराव्यांसह मोठा आरोप

    November 7, 2026

    भयंकर! एकाच कुटुंबातील ७ जणांची निर्घृण हत्या!

    November 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif