अभिनेत्री सुश्मिता सेनला हृदयविकाराचा झटका…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

अभिनेत्री सुश्मिता सेन बाबतीत मोठी बातमी समोर आली आहे. आणि ती तिने खुद्द सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिने तिला हृदयविकाराचा तिव्र झटका आल्याच सांगितले आहे. यावेळी तिला चाहत्यांनी तिच्या आरोग्याची काळजी घ्या असे तिला कमेंट करत सांगितले आहे. सोबतच तिच्या उत्तम आरोग्यासाठी ही चाहते प्रार्थना करीत आहे.

https://www.instagram.com/p/CpSF-IvtWG4/?utm_source=ig_web_copy_link

अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. सध्या तिची प्रकृती ठीक असल्याचे तिने सांगितले आहे. अभिनेत्रीने तिच्या वडिलांसोबतचा एक फोटो शेअर करत अभिनेत्रीने लिहिले की, तुमचे हृदय मजबूत आणि आनंदी ठेवा. तुमच्या वाईट काळात तो नेहमी तुमच्या पाठीशी उभा राहील. जेव्हा तुम्हाला त्याची सर्वात जास्त गरज असते. ही ओळ माझ्या वडिलांनी सांगितली होती. दोन दिवसांपूर्वी मला हृदयविकाराचा झटका आला होता. माझी अँजिओप्लास्टी झाली. माझी प्रकृती पूर्णपणे ठीक आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझे हृदय खरोखर मोठे असल्याचे माझ्या हृदयरोगतज्ज्ञांनी सांगितले आहे.

अभिनेत्रीने पुढे लिहिले की, मी त्या सर्व लोकांचे आभार मानू इच्छिते ज्यांनी मला वेळेवर रुग्णालयात नेले. त्याच्या तत्पर कारवाईमुळे मी सावरू शकले. त्यांच्याबद्दलही मी पुढच्या पोस्टमध्ये सांगेन. ही पोस्ट माझ्या चाहत्यांसाठी आहे. मी पूर्णपणे ठीक आहे ही चांगली बातमी शेअर करण्यासाठी, ही माझी पोस्ट होती.

अभिनेत्रीच्या या पोस्टवर चाहत्यांकडून सातत्याने प्रतिक्रिया येत आहेत. अभिनेत्री लवकर बरी व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. 47 वर्षीय सुष्मिता सेन तिच्या फिटनेसची विशेष काळजी घेते. अभिनेत्रीच्या हृदयविकाराच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. अभिनेत्री तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर फिटनेस व्हिडिओ शेअर करत असते.

Leave A Reply

Your email address will not be published.