जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;
गरीब परिस्थितीत ज्या आईने राब राब राबून खंबीरपणे उभे रहात लहानाचे मोठे केले त्याच उपकाराची परत फेड करत जळगाव येथील वाघ नगर मध्ये रहिवासी असलेल्या सुशांत इंगळे याने स्वबळावर मेहनत करून नौदलात नोकरी मिळवली. सुशांतने नुकतीच ओडीसा येथे ट्रेनिंग पूर्ण केली असून 3 महिन्या नंतर तो घरी आला. सुशांतच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तर त्याच्या आईचा आनंद गगनात मावेनासा झाला.
दि. 4 ऑगस्ट गुरुवार रोजी जळगाव येथील पद्मालय शासकीय विश्रामगृह येथे लोकशाही मराठी पत्रकार संघ जळगाव जिल्हा पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा पदाधिकारी पत्रकार बांधवांकडून शॉल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराप्रसंगी आईचे मामा, माजी पंचायत समिती सदस्य विजय तायडे, कस्तुराबाई थाटे (आजी), मिनाबाई इंगळे (आई), सरिता पाटील, कविता पाटील, मिलिंद पाटील, मनीष सैनी, प्रवीण तायडे, विष्णू मोरे, महेंद्र चौधरी, प्रमोद परदेशी, शेख जावेद, मुसा तडवी, निलेश वाणी, अनिल केऱ्हाळे, अरविंद मानकरी राष्ट्रवादीचे रवींद्र पाटील उपस्थित होते.