वडिल ST आंदोलनात गेले; मुलाने घेतला गळफास

0

लोकशाही न्युज  नेटवर्क 

 

सोलापूर : तालुक्यातील कोंडी येथील राहत्या घरी एसटी ड्रायव्हरच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा दुर्दैवी प्रकार २.२० बुधवारी दुपारच्या सुमारास घडला. याची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे. अमर तुकाराम माळी (वय २० रा. कोंडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. अमर माळी याचे दयानंद महाविद्यालयात १२वीपर्यंत शिक्षण झाले आहे. तो गेल्या काही दिवसात शांत शांत बसत होता.

अमरने बुधवारी सकाळी त्याने वडील तुकाराम माळी यांना पैशाची मागणी केली होती. वडिलांनी माझे काम दोन, तीन महिने झाले बंद आहे, मला पगार नाही, तुला पैसे कुठून देऊ असे त्याला म्हणाले होते. बोलणे झाल्यानंतर वडील एसटीचे आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी गेले. अमर हादेखील घराबाहेर गेला, त्यानंतर तो दुपारी घरी आला. घरात आई व त्याची चुलती जेवण करत होते.

आईने त्याला जेवण्यासाठी आग्रह केला, मात्र तो नको म्हणत थोडा आराम करतो म्हणून स्वतःच्या खोलीत गेला. बराच वेळ झाले तरी तो बाहेर आला नाही म्हणून आईने त्याला आवाज दिला. मात्र आतून प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे त्या खोलीजवळ गेल्या. आवाज देऊ लागल्या, मात्र काहीच आवाज येत नव्हता, आतून कडी लावण्यात आली होती.

मोठ्या भावानेही आवाज दिला, शेवटी खिडकीतून पाहिले असता अमर साडीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. भावाने दरवाजा तोडून आत प्रवेश केला अमरला खाली उतरवले. अमरला पाहताच आईने हंबरडा फोडला. त्याला उपचारांसाठी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

वडील आंदोलनामध्ये होते त्यांना त्यांच्या भावाने फोन करून घरी बोलावून घेतले. तुकाराम माळी हे घरी आले असता त्यांना मुलाने आत्महत्या केल्याचे समजले. अमर हे तू काय केलेस? माझा पगार झाला नसल्याने तुला पैसे नाही म्हणालो होतो. असे म्हणत ते ओक्साबोक्शी रडू लागले.

अमर याचे १२ वी सायन्सपर्यंतच शिक्षण झाले होते. तो अभ्यासात हुशार होता, त्याने असे कसे काय केले कळत नाही अशी चर्चा त्याच्या मित्रांमध्ये होती. मयत अमर माळीचा परिवार मोठा आहे, त्याला चार चुलते, एक सख्खा भाऊ, भावजय, चुलतभाऊ आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.