क्रिडा समन्वयकांसाठी योग आणि सूर्यनमस्कार प्रशिक्षण संपन्न

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व क्रीडा भारती जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २२ जानेवारी २०२५ रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुका क्रीडा कीडा समन्वयकांसाठी शास्त्रोक्त पद्धतीने योग आणि सूर्यनमस्कार प्रशिक्षणाचे आयोजित करण्यात आले.

शरीर स्वास्थ्य टिकवण्यासाठी सूर्यनमस्काराचे शास्त्रोक्त अभ्यासासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली चंचल माळी, राज्य क्रीडा मार्गदर्शक (योगा) यांनी उपस्थितांना प्रशिक्षण दिले.

या प्रशिक्षणास अजय देशमुख , मनोज पाटील , संजय वाढे , सुनील वाघ , गिरीश पाटील , संदीप पाटील , सचिन भोसले , सचिन सूर्यवंशी , दिलीप संगेले , संजय निकम , युवराज माळी , प्रदीप साखरे , असिफ खान , राजेंद्र अल्हाट, प्रशांत कोल्हे , राजेश जाधव, अध्यक्ष जिल्हा डॉजबॉल असोसिएशन व खेळाडु आदि मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.