देशी दारूचा महापूर..उभी बाटली आडवी करण्यासाठी आदिवासी रणरागिणींचा ग्रामसभेत रुद्रावतार..

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

सुरगाणा; तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गुजरात सीमेवरील कुकूडणे येथे फेब्रुवारी २०२० मध्ये नाशिक येथील देशी दारू दुकानचे  ठेकेदार उज्वला राजेश खोब्रागडे यांच्या नावे सुरू असलेले देशी दारूचे गोडाऊन बंद करण्यासाठी महिला आक्रमक झाल्या होत्या महिलांनी ग्रामसभेत आरोप केला की, गावात देशी दारू दुकानसुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारची पूर्वपरवानगी न घेताच ग्रामसेवक गंगाधर गवळी व सरपंच वसंती तुकाराम चौधरी यासह काही सदस्यांनी महिलांच्या खोट्या सह्या करून परस्पर ठराव केला आहे.

सदर गाव आदिवासी पेसा क्षेत्रातील असून देशी दारू विक्रीसाठी परवानगी देऊ नये त्याचप्रमाणे कुकुडणे हे गाव गुजरात सीमेलगत आहे. गुजरात राज्यात दारूबंदी असतांना या भागात दारूविक्री करीता परवानगी कशी देण्यात आली या बाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. सदर माल हा

गुजरात राज्यात पाठविला जातो या देशी दारू दुकानामुळे या भागात मद्यपिंचे

प्रमाण वाढले असून अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. शाळकरी मुले महाविद्यालयीन विद्यार्थी हे दारूच्या आहारी गेले आहेत या देशी दारू दुकानांचे खूपच वाईट दुष्परिणाम या भागातील आदिवासी जनतेला भोगावे लागत आहेत.

ग्रामसभा सुरू असताना महिला आक्रमक झाल्या होत्या ग्रामसेवकास महिलांनी विचारणा केली असता पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, विस्तार अधिकारी के. के. गायकवाड यांच्या कारकिर्दीत देशी दारू दुकान दुकानाच्या ठरावास मंजुरी दिली होती असे त्यांनी सांगितले या भागात देशी

दारूची लाखो रुपयांची विक्री होत आहे त्यामुळे व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढले असून दिवसा ढवळ्या चोऱ्या, खून, हाणामाऱ्या होत आहेत तसेच महिलांची छेड काढणे घरगुती भांडणे आदींचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे देशी दारू दुकान तात्काळ या गावातून बंद करण्यात यावे अशी मागणी महिलांनी केली आहे. फोटो- कुकूडणे ता.सुरगाणा येथील ग्रामसभेत दारू बंद करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतलेल्या महिला..

प्रतिक्रिया-

” कुकूडणे  हे गाव आदिवासी पेशा क्षेत्रात येत असून देशी दारूचे दुकान सुरू झाल्यापासून गाव परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. रात्री-अपरात्री महिलांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. देशी दारू मुळे व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढले असून अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. शालेय मुले, युवकांमध्ये व्यसनाचे प्रमाण खूप वाढले आहे त्यामुळे हे देशी दारूचे दुकान तात्काळ बंद करण्यात यावे”.

रेखा देशमुख.

महिला बचतगट अध्यक्ष

Leave A Reply

Your email address will not be published.