सुरगाणा नगरपंयतीवरती शिवसेनेचा भगवा

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

सुरगाणा ;सुरगाणा नगरपंयतीवरती शिवसेनेचा भगवा फडकला  असुन भरत लक्ष्मण वाघमारे यांची नगराध्यक्ष वर्णी लागली आहे.तर उपाध्यक्ष पदी माकपाच्या माधवी राहुल  थोरात यांची चिठ्ठी व्दारे निवड करण्यात आली. दरम्यान सुरगाणा नगपंचरतीत  भाजप ८, शिवसेना ६, माक प २, राष्ट्रवादी, १ याप्रमाणे  नगरसेवक आहेत. व शिवसेनेने कडुन  भारत लक्ष्मण वाघमोरे  यांनी नामंकन पत्र दाखल  केले होते.

हे पद मिळविण्यासाठी दोन्ही  कडुन  जोरदार प्रयत्न सुरू असताना प्रथम मच  निवडणूक लढवत विजय  प्राप्त भाजपच्या नगससेविका  कासुबाई नागू पवार  यांचे   निधन झाल्याची वाताँ आली आणि शहरात शोककळा पसरली  . त्यानंतर आज नगराध्यक्ष पदाची चिठ्ठी व्दारे निवड करण्यात आली आहे . या निवड प्रक्रियेत शिवसेनेचा वरचष्मा  राहिला आहे. तर माकपाने दोन जागा  आणुन देखील   उपनगराध्यक्ष पदाची माळ गळ्यात घातली आहे.

शिवसेनेचे  भरत वाघमारे  नगराध्यक्ष तर माकपच्या माधवी राहुल थोरात यांची उपनगराध्यक्ष पदी निवड करण्यात आली. यावेळी  सुरगाणा पोलिस निरीक्षक संदिप कोळी याच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.