Wednesday, August 10, 2022

सुरगाणा महाविद्यालयात जागतिक सामाजिक न्याय दिन साजरा.

- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क  

- Advertisement -

 

- Advertisement -

- Advertisement -

सुरगाणा : महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला ,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, सुरगाणा येथे महिला कल्याण व तक्रार निवारण समिती च्या वतीने दिनांक 20 फेब्रुवारी रोजी “जागतिक सामाजिक न्याय दिन “साजरा केला गेला. या दिनाचे औचित्य साधून  आभासी पद्धतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी  अमोल गायकवाड (उपविभागीय पोलीस अधिकारी, कळवण) व श्रीमती सविता होलगडे (महिला बालकल्याण पर्यवेक्षिका, सुरगाणा) प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.

कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायाच्या संदर्भात व्याख्यान देण्यात आले. या कार्यक्रमाचा  मुख्य हेतू हा जनमाणसात आणि शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जागतिक सामाजिक न्याय  दिना विषयी जागृकता निर्माण करणे हा होता. आपल्या व्याख्यानात  अमोल गायकवाड यांनी सामाजिक न्याय  म्हणजे काय?  आपल्या समस्या आपल्यावरील अन्यायाला दूर करण्याकरीता न्याय मिळविण्यासाठी काय करावे? आदिवासी भागात बहुसंख्य मुले शिक्षणापासून वंचित राहतात अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे गरजेचे आहे.

त्यासाठी एक सामाजिक जाणीव म्हणून आपण सगळ्यांनी त्यांचं पालकत्व घेऊन त्यांना शिक्षणाचा प्रवाहात आणणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे समाज सुशिक्षित होऊन जातीभेद निर्मूलन होऊ शकते. सामाजिक समता नसती तर आपण शिक्षणाच्या प्रवाहात आलो नसतो तसेच अनुसूचित जाती जमाती यांच्याविषयी असलेले कायदे याविषयी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपले लक्ष गाठण्यासाठी प्रयत्न करावे. गुन्हेगारी वृत्ती पासून दूर राहावे चांगले शिक्षण घेऊन यशस्वी व्हावे. असे मत प्रमुख वक्त्त्यांनी व्यक्त केले.

तसेच कार्यक्रमाच्या दुसऱ्या वक्त्या श्रीमती सविता होलगडे यांनी महिला व बालकां विषयी असलेले कायदे व त्यांना सरकार मार्फत देण्यात येणाऱ्या आरोग्य विषयक सुविधा याविषयी माहिती दिली या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ.सी.जी. दिघावकर यांनी आपल्या मनोगतात जगातील प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित रहावे त्यांना सन्मानपूर्वक जगता यावे मानवाधिकार हे वंश, लिंग, राष्ट्रीयत्व, भाषा धर्म, वय किंवा कसलाही भेदभाव न करता सर्व मानवासाठी अंतर्भूत आहे.  ते अबाधित राहण्यासाठी आपल्या हक्कांबाबत जागरुक रहावे. त्याच बरोबर कर्तव्या प्रति ही जागरूक राहणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन केले. याच बरोबर सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला कल्याण व तक्रार निवारण समिती समन्वयिका प्राध्यापिका कविता भोये यांनी केले.

तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सोमनाथ पावडे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विशाखा समिती समन्वयीका डॉ.स्मीता हरने यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक व्हि.डी.अहिरे,  प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचं मोलाचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स नाईक विनाेद ज्ञानाेबा चलवाड (२९ रा. लातूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन मनाेज अशाेक धाेत्रे (२३ रा. गाेपाळ नगर, लातूर), सुशांत दत्तात्रय जाधव (रा. एलआयसी काॅलनी, लातूर), बालाजी सखाराम दणदिवे (रा. गाेपाळनगर, लातूर), रणजित रमेश माेहिते (रा. एलआयसी काॅलनी, लातूर), अमर बाळासाहेब ढाेणे (रा. एलआयसी काॅलनी, लातूर), सलीम रज्जाक शेख (रा. एलआयसी काॅलनी, लातूर), शुभम तुमकुटे (रा. एलआयसी काॅलनी, लातूर) याच्यासह इतर सहा ते सात जणांविराेधात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पाेलीस अधीक्षक अनुराग जैन, लातूर शहर उपविभागीय पाेलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे, परिविक्षाधीन पाेलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख, पाेलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलीस उपनिरीक्षक महेश गळगटे, पाेलीस कर्मचारी संजय कांबळे, दयानंद साराेळे, मुन्ना नलवाड, दिनेश हवा, नारायण शिंदे यांच्या पथकाने केली.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या