Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»“बरं झालं पक्ष फुटला..”
    राजकारण

    “बरं झालं पक्ष फुटला..”

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 17, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    आज शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीची आढावा बैठक पार पडली. या बैठकीतील खासदार सुप्रिया सुळे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. तसेच पक्ष फुटला हे बरं झाल्याचं मोठं विधानही त्यांनी केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे

    सुप्रिया सुळे यांनी विधान केलं आहे. मला कधी कधी वाटतं बरं झालं पक्ष फुटला. ते या पक्षात असते आणि मी या पक्षात असते तर एक तर ते तरी राहिले असते किंवा मी तरी राहिले असते. मी त्या पक्षात काम करू शकत नाही. सगळया दुनियेला माहीत आहे. माझी लढाई त्यांच्याबरोबर ते पक्षात असतानाही होती. मी हे कधी बाहेर बोलले नाही, पण संघटनेत आहे म्हणून बोलते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांचं नाव न घेता जोरदार निशाणा साधला.

    जो पुरुष स्वत:ची जी बायको, जी आपल्या मुलांची आई आहे, तिच्या गाडीत बंदूक ठेवू शकतो अशा पुरुषाबरोबर… एक तर तो पुरुष नाहीच आणि त्याच्याबरोबर मी काम करू शकणार नाही. तेव्हापासून लढाई सुरू झाली. मी आज पहिल्यांदाच ही गोष्ट बोलले. मी माईकवरही बोलेल. मी नाही कुणाला घाबरणार. मी असली फालतू लढाई करत नाही. मी विरोधी पक्षात आयुष्य घालवेल, पण नैतिकता सोडणार नाही. मला नकोय ते कंत्राटदाराचे पैसे. माझं घर काही त्या कॉन्ट्रॅक्टरच्या पैशावर चालत नाही.

    तसेच संतोष भाऊच्या आईला भेटा, बायकोला भेटा. महादेव मुंडेंच्या बायकोला भेटा. काय चूक केली त्यांनी? त्यांच्याकडे मुलांना लेकरं म्हणतात. आपण मुलं म्हणतो. महादेव मुंडेंची बायको विचारते, माझ्या लेकरांची चूक काय उत्तर द्या? काय उत्तर देणार? आणि मग जेव्हा संतोष भाऊच्या घरी गेले. त्यांच्या आईने माझा हात धरला. म्हणाल्या, तू मला न्याय देणार का? शब्द दे सुप्रिया तू मला न्याय देशील, असंही त्या म्हणाल्या.

    Dhananjay Munde supriya sule
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    राहुल गांधी यांनी चर्चेपासून पळू नये : भाजपची मागणी

    August 11, 2026

    फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली

    August 10, 2026

    संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती

    August 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif