Thursday, September 29, 2022

सनी लिओनीची ऑनलाईन फसवणूक; सिबील स्कोर खराब

- Advertisement -

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

सध्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणावर उघडकीस होत आहेत. त्यामध्ये वारंवार ऑनलाईन वेगळ्या पध्दतीने फसवणूक झाल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे प्रत्येक वापरकर्ता नेहमी आपल्या अकाऊंट आणि बँकेतील  अनेक गोष्टींना घेऊन सजग असतो. सामान्य माणसांची फसवणूक झाल्याचे आत्तापर्यंत आपण पाहिले आहे. परंतु एखाद्या सेलिब्रिटीची (celebrity) ऑनलाईन फसवणूक झाल्याचे आपल्या क्वचित लक्षात येते.

- Advertisement -

- Advertisement -

नुकतीच सनी लिओनीची (sunny leone)ऑनलाईन फसवणुक झाल्याचे उघड झाले आहे. फसवणूक झाल्यानंतर सनी लिओनीने ही गोष्टी ट्विटरच्या माध्यमातून उघडकीस आणली. पण काही तासांनंतर ते ट्विट तिने डिलेट केले असल्याचे पाहायला मिळाले आहे. सनीचं पॅनकार्ड वापरून एकाने चक्क दोन हजार रूपयांचे कर्ज काढले असल्याचे पाहायला मिळाले आहे.

सनीचं लिओनीचं पॅन कार्ड वापरून एका अज्ञात व्यक्तीने 2 हजार रूपयांचे कर्ज काढले आहे. हे ज्यावेळी सनीच्या लक्षात आले त्यावेळी सनीने तिच्या ट्विटरच्या अकाऊंटवरून फसवणूक झाल्याचे जाहीर केले. पण नेटक-यांनी संबंधिताचे तिला फोन यायला सुरू झाल्यानंतर वैतागलेल्या सनी लिओनीने ते ट्विट डिलीट केले आहे. पण झालेली फसवणूक ही अनेकांची होऊ नये, तसेच हे कसं शक्य आहे ? किव्हा याला काय तरी उपाय करायला हवा त्यामुळे सनी लिओनीने हे ट्विट केले होते. अनेकांची अशी ऑनलाईन पध्दतीने फसवणूक केली जाते. त्यामुळे प्रत्येकांने आपल्या अकाऊंटबाबत सजग असले पाहिजे. तसेच असे प्रकार होऊ नये यासाठी त्यावर बँकांनी काय तरी निर्बंध घालायला हवेत.

दरम्यान फसवणूक केलेल्या अनेकांनी इंडियाबुल्स सिक्युरिटीज लिमिटेडमध्ये तक्रारी केल्या आहेत, आत्तापर्यंत असंख्य तक्रारी दाखल झाल्या असतील. सनीने काल फसवणूक झाल्यानंतर ट्विट केले त्यात सुध्दा तिने इंडियाबुल्स सिक्युरिटीज लिमिटेड टॅग केले आहे. कारण ही फसवणुक कोणी केली आहे. त्यामुळे सनीचा सिबील स्कोर खराब झाल्य़ाचे देखील सनीने पोस्ट मध्ये म्हणाली होती. तसेच फसवणुक झालेल्या अनेकांचे सनीला कॉल देखील आले. कुठे तक्रार करायची तसेच त्याचं ऑफिस कुठे आहे, असे फोन यायला लागल्याने अखेर सनीने आपले ट्विट डिलीट केले.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या