सनी देओलचा ‘गदर २ द कथा कंटिन्यू’ घालणार पुन्हा ‘धुमाकूळ’

0

लोकशाही न्यूज नेटवर्क गदर’ सिनेमाने तारासिंग आणि सकीनाची प्रेमकहाणी असणाऱ्या ‘चांगलाच धुमाकूळ घातला होता. हॅंडपंप उचलून लढणाऱ्या सनी देओलवर चाहते खूपच प्रभावित झाले होते.आता सानी पाजींचा तोच अंदाज गदर २ या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

‘गदर २ द कथा कंटिन्यू’ (Gadar 2 The Katha Continues)असे सिक्वलचे नाव आहे. यातील सनी देओलची एक झलक नुकतीच सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. यात तो बैलगाडीचे चाक उचलून लढताना दिसणार आहे. अमिषा पटेल सकीना च्या भूमिकेत आहे. गदर २’चं शूटिंग पूर्ण झालं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केलं आहे. या चित्रपटात त्यांचा मुलगा उत्कर्ष शर्मा देखील दिसणार आहे, ‘गदर: एक प्रेम कथा’ मध्ये बालकलाकार असलेला उत्कर्ष ‘गदर २’मध्ये नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.गदर २ चे शूट लखनऊमध्ये झाले आहे. लखनऊच्या मार्टिनियर कॉलेजलाच पाकिस्तान सेनेचे मुख्यालय बनवून तिथे पाकिस्तानचा झेंडा फडकवण्यात आला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.